Headlines

दुष्काळ जाहीर करा; कन्नड तहसीलवर 4.5 हजार शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात प्रशासनास निवेदन‎




कन्नड आणि सोयगाव तालुक्यात पावसाने ५० दिवसांचा खंड दिल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे हे तालुके अधिकृत दुष्काळी यादीतून वगळले गेले आहेत. या वास्तवाविरोधात आणि शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत मिळावी यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पिशोर नाका ते तहसील कार्यालयावर साडेचार हजार शेतकऱ्यांचा धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे व निष्काळजीपणाचे आरोप केले. ते म्हणाले, शासकीय परिपत्रकानुसार ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर होतो. मात्र, महसूल मंडळात पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रच नाही. आणेवारी समिती स्थापन झालीच नाही. परिणामी, मागील वर्षीही शेतकरी पीक विमा आणि अनुदानापासून वंचित राहिले. या वेळी राजेंद्र हार्दे, राजू मगर, ज्ञानेश्वर जाधव, नीळकंठ पाटील, वैभव सोनवणे, प्रशांत सोनवणे, गणेश घुगे, राजू तुपे, जावेद शेख, मांगू सखाराम पाटील, राजेंद्र शेजवळ, भावेश शिंदे, दयानंद बनकर, रावसाहेब दाभाडे, प्रकाश लवांदे उपस्थित होते. कन्नड तालुक्यात एक लाख हेक्टरवर खरिपाचे पीक असून, ५० दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने ३९ हजार हेक्टरवरील कापूस, मका ४५ हजार हेक्टर, तूर ८ हजार हेक्टर, सोयाबीन ५ हजार हेक्टर क्षेत्रावर होते. ही सर्व पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत. त्यात पर्जन्यमापक यंत्रच नसल्याने मदत मिळत नाही. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अवचित वळवळे म्हणाले की, या तालुक्याला आज कोणताही वाली उरलेला नाही. बाजार समिती विकून टाकली गेली. हर्षवर्धन जाधव यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावर तहसीलदार भगत यांनी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले, हा मतदारसंघ स्व. रायभान जाधव व तेजस्विनी जाधव यांचा आहे, ज्यांनी सिंचन प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना सक्षम केले. गेली तीन वर्षे अंगणवाडी सेविकांना खिचडीचे पैसे मिळाले नाहीत. एमआयडीसी नसल्याने रोजगार नाही, असेही ते म्हणाले. शासकीय परिपत्रकानुसार ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर होतो. मात्र, कन्नड तालुक्यातील महसूल मंडळात पाऊस मोजण्यासाठी साधे पर्जन्यमापक यंत्रच उपलब्ध नाही. आणेवारी समिती स्थापन झालीच नाही. मागील वर्षीही शेतकरी पीक विमा आणि अनुदानापासून वंचित राहिले. एक लाख हेक्टरवरील पिके शेतातच करपली ३ वर्षांपासून अंगणवाडी सेविका खिचडीच्या पैशांपासून वंचित कन्नड तालुक्यामध्ये दुष्काळ मोजायला पर्जन्यमापक नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *