Headlines

‘हिस्टरी टॉक अँड हेरिटेज साइट्स’ उपक्रमात उलगडला पैठणनगरीचा वैभवशाली इतिहास:पालथी नगरी परिसरात पुनश्च उत्खनन करण्याची मागणी‎



पैठणच्या वैभवशाली व प्राचीन इतिहासाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘हिस्टरी टॉक अँड हेरिटेज साईट्स’ या विशेष उपक्रमाचे आयोजन नागघाट मंदिर, पैठण येथे करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व इतिहासप्रेमींना पैठणच्या प्राचीन सुवर्णक

.

अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई कुलकर्णी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इतिहास संशोधक जयवंत पाटील यांनी पैठणचा समग्र इतिहास या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. प्राचीन प्रतिष्ठाननगरी, सम्राट सातवाहन, चक्रधर स्वामी, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, राजर्षी शाहू महाराज, भोगनारायण मंदिर, हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृतीचे संदर्भ, पालथी नगरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, नवनाथ परंपरा, तीर्थखांब, सिद्धेश्वर मंदिर, जालिंदरनाथ मठ व देवनाथ मंदिर अशा विविध विषयांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

प्रा. संतोष गव्हाणे यांनी सम्राट सातवाहन वंश आणि पैठण या विषयावर बोलताना ४६० वर्षे राज्य करणाऱ्या सातवाहन राजवटीतील ३० राजांचा इतिहास मांडला. उज्जैन ते आंध्र प्रदेश या मोठ्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या या राजवटीतील परदेशी व्यापार, राणी नागणिका काळातील नाणेघाट येथील शिलालेख आणि तेर-ढोकी, भोगवर्धन आदी संदर्भांसह त्यांनी सातवाहनांचा इतिहास उलगडला. तर प्रा. हंसराज जाधव यांनी चक्रधर स्वामींच्या काळातील पैठण, घाट आणि महानुभाव पंथाची स्थापना याविषयी विचार व्यक्त केले. या प्रसंगी रेखाताई कुलकर्णी, दिनेश पारिख, उपनगराध्यक्ष तुषार पाटील व शिवाजी गाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक गोवर्धन टाक, गणेश वरकड, शिवा पारिख, उदय सुलाखे, प्रा. राजेश करपे, जालिंदर फलके, आतिष गायकवाड, सुनील पायघन, मदन आव्हाड, दादासाहेब घोडके, उमेश तट्टू, सचिन उंडाळे, भूषण रावस, सुनील मडके, सुधीर रावस, बाळू जोमदे, प्राचार्य रामदास रामावत, रामदास तांगडे, जालिंदर येवले, खलील धांडे यांच्यासह पैठण दुर्ग प्रतिष्ठान, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन जिज्ञासेचे केले निरसन आजच्या तरुण पिढीला शहराचा इतिहास समजावा व वारसा संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने बालगोपाळ गणेश मंडळ, प्रतिष्ठान पुस्तक प्रकाशक समिती, ताराई महाविद्यालय, श्री नाथ हायस्कूल, आयकॉन पॅराडाईज स्कूल आणि आदिशक्ती महिला नागरी पतसंस्था आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना जयवंत पाटील यांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांच्या जिज्ञासेचे निरसन केले. सूत्रसंचालन हर्षवर्धन पाटील यांनी केले, तर आभार प्राचार्य गणेश शिंदे यांनी मानले. नव्या पिढीपर्यंत पैठणचा समृद्ध इतिहास पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत ज्ञानवर्धक ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *