![]()
राज्यात आश्रमशाळांमधील तेरा वर्षांवरील मुलींना प्रत्येक सुट्टीनंतर शासकीय रुग्णालयात जाऊन चारित्र्यशुद्धतेचा ‘सरकारी पुरावा’ द्यावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पोळ्याच्या सुट्टीनंतर आश्रमशाळेत परतणाऱ्या मुलींची घोटी आणि कळवण रुग्णालयांच्या आवारात रांग लागली होती. पॅथ लॅबमध्ये त्यांच्या शुद्धतेची तपासणी होणार होती. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लिहिलेल्या त्यांच्या हातातल्या कागदावर रुग्णालयाचा शिक्का पडत होता ‘प्रेग्नन्सी निगेटिव्ह’. स्वत:च्या चारित्र्याचे ‘शासकीय प्रमाणपत्र’ घेऊन लाजिरवाण्या मनाने आणि झुकलेल्या मानेने इतरांच्या नजरा चुकवत त्या रुग्णालयाच्या बाहेर पडत होत्या. विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे आणि त्यांच्या विनंतीवरून शाळेची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. मात्र हे सर्व पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती आहेत.
विद्यार्थिनींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात नाही आमच्या विभागातर्फे अशी कोणतीही टेस्ट केली जात नाही. आश्रमशाळेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थिनींची फक्त वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रेग्नन्सी टेस्ट केली जात नाही. – प्रा. अशोक उईके, आदिवासी विकासमंत्री हा तर आदिवासींच्या आत्मसन्मानाशीच खेळ राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सुट्टीवरून येणाऱ्या मुलींना ही टेस्ट करावीच लागत आहे. अनेकदा सरकारी किट उपलब्ध नसेल तेव्हा मुलींना मेडिकलमधून किट खरेदी करून हा रिपोर्ट द्यावा लागतो. हे तर बालकांचे शोषण. – भगवान मधे, एल्गार संघटना नाव : xxxx । वय 14 वर्षे । इयत्ता आठवी ‘पोळ्यापासून आठवडाभर सुट्टीवर घरी गेले होते. आता शाळेत जाण्याआधी ही टेस्ट करून घ्यायला सांगितली म्हणून आले. खूप लाज वाटते. वडिलांना यासाठी सोबत घेऊन यावं लागतं, पण काय करणार?’ नियम सांगतो, सक्ती नाही आदिवासी विकास विभागाचे परिपत्रक (11 नोव्हेंबर 2011) मधील परिशिष्ठ ड नुसार आश्रमशाळेतील प्रवेशापूर्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींची फक्त आरोग्य तपासणी आवश्यक आहे. नाव : xxxx । वय : 16 वर्षे । इयत्ता : दहावी ‘ही माझी दुसरी टेस्ट. शाळेत प्रवेश घेताना करायला लावली होती. आता सुट्टीनंतर करते आहे. गावातही हसतात, पण शाळेसाठी करावंच लागतं.’ नाव : xxxx । वय : 16 वर्षे । इयत्ता : दहावी शाळेतली मुलं चिडवतात, त्याचा त्रास होतो । गावातही हसतात, पण शाळेसाठी करावंच लागतं
Source link
अपमानशाळा:आश्रमशाळांमध्ये सुट्टीवरून आलेल्या विद्यार्थिनींची करतात प्रेग्नन्सी टेस्ट, मंत्री म्हणतात- असं काही होत नाही, मात्र विद्यार्थिनींनी दाखवले पुरावे