Headlines

मोबाइलच्या जगतात पुस्तकांकडे वळण्याचा अनोखा संदेश:नगर जिल्हा वाचनालयाचा ‘पुस्तकांचा आरसा’ उपक्रम; वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न‎




सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना विद्येची देवता असलेल्या गणरायासमोर विचारांची व वाचनाची वृद्धी व्हावी, तसेच समाजामध्ये वाचन संस्कृती अधिक रुजावी या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने ‘पुस्तकांचा आरसा’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. गणरायाच्या सान्निध्यात पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या देखाव्याला वाचक तसेच रसिक नगरकरांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा वाचनालयात विराजमान झालेल्या गणरायासमोर अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकूर व प्रमुख कार्यवाहक विक्रम राठोड यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच पुस्तकांमधून विचारांची समृद्धी कशी होते, याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. वाचन संस्कृती वाढविणारे विविध सुविचार देखाव्यामध्ये ठळकपणे मांडण्यात आले असून, ते वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणरायाच्या मूर्तीसमोर विविध लोकप्रिय व वाचनीय पुस्तके आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक व वैचारिक संदेश देणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने जिल्हा वाचनालयाने पुस्तकांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा उपक्रम राबविला आहे. मोबाइल व डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात पुस्तके आणि वाचनाची सवय यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा देखावा विशेष ठरत आहे. विशेषतः युवा पिढीने पुस्तकांकडे वळावे आणि नियमित वाचनातून आपली विचारशक्ती व ज्ञानसमृद्धी वाढवावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘पुस्तकांचा आरसा’ हा देखावा रसिक नगरकरांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन जिल्हा वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, खजिनदार तनवीर खान, सहकार्यवाह राहुल तांबोळी, ग्रंथपाल अमोल इथापे, सहग्रंथपाल नितीन भारताल आदींनी केले आहे. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी यंदा गणेशोत्सवात गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. देखावे पाहण्यासाठी सायंकाळच्या वेळी नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील रस्ते गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून जात आहेत. नागरिकांकडून देखाव्यांचे कौतुक होत आहे. गणेश मंडळांनी धार्मिक, आध्यात्मिक, पर्यावरणपूरक, सामाजिक असे अनेक देखावे साकारले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *