![]()
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ, माळी गल्ली हे याच परंपरेचा वारसा जपत गणेशोत्सव साजरा करत आहे. केवळ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करणे एवढ्यापुरते मंडळाचे कार्य मर्यादि
.
मंद्रूप गावातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. विविध गणेश मंडळे आपल्या-आपल्या पद्धतीने उत्सव साजरा करतात. त्यामध्ये माळी गल्लीतील महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाने गेल्या ३५ वर्षांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.भक्ती, सामाजिक बांधिलकी, समाजप्रबोधन आणि युवकांचा सहभाग या चारही गोष्टींचा समतोल साधत मंडळाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येतात. त्यामुळे सामाजिक सलोखा, शांतता आणि शिस्त राखण्याबरोबरच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावरही मंडळाचा भर राहील . ध्वनिप्रदूषण टाळणे, स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, गणेश विसर्जनाबाबत जागृती करणे यासारख्या बाबींनाही महत्त्व देण्यात येत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले.