![]()
कापूराच्या यात्रेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा या ठिकाणी वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, चांदूर रेल्वे येथून मांजरखेड मार्गे सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील पूल नादुरुस्त होत असून तो तुटल्यामुळे
.
विशेष म्हणजे, या परिसरात ना मुसळधार पाऊस झाला, ना दुसरे कुठले नैसर्गिक संकट ओढवले. तरीही रस्त्यावरील पूल खचल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. या मार्गावरून होणारी जड वाहतूक आणि पुलाची झालेली दुरवस्था यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, पुलाच्या खचण्याचे नेमके कारण संबंधित प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पूल खचल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता घटनास्थळी बॅरिकेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. विशेषतः दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रवास करणे जीवावर बेतू शकते असे संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांचे म्हणणे आहे. दरम्यान भाविक भक्त तसेच प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून, खचलेल्या पुलाच्या मार्गाने प्रवास न करता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
या रस्त्यावर सुरक्षेच्यादृष्टीने बॅरिकेड लावन्याचे काम पोलीस पाटील हिरासिंग राठोड, विश्वस्त गोविंद राठोड, लक्ष्मण राठोड, ग्रामस्थ आशिष कुकडकर, गजानन मंगळे, किशोर राठोड, शरद पाटील, कल्पेश मंगळे, दुर्गेश राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
संस्थानने वारंवार दिली निवेदने सावंगा विठोबा संस्थानच्या वतीने रस्त्याची व पुलाची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधीकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती, असे संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, वेळेत दखल न घेतल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संस्थांनाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी केला आहे. दरम्यान ग्रामस्थाकडूनही प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.