![]()
वक्तृत्व ही सर्वोत्तम कला असून त्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आत्मविश्वासही उंचावतो. या दृष्टीने महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे महत्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कलागुणांचा विकास करावा. खेळामुळे आपला सर्वांगीण विकास होतो तसेच जीवनात एक वेगळाच आनंद मिळतो. खेळामुळे आलेल्या संकटांना तोंड देण्याची ताकत मिळते, असे मत अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले. अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचेवतीने कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. भास्करराव गलांडे यांच्या स्मृतिदिनी महाविद्यालयालयीन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, कारखान्याचे व्हा.चेअरमन आदिनाथ झुराळे, सुरेश गलांडे, संचालक भाऊसाहेब उंडे, विरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, रमेश वारुळे, सचिन बडधे, तिलक डुंगरवाल, काशिनाथ गोराणे, संतोष डहाळे, संतोष देवकर, प्राचार्य संपत देसाई, प्राचार्य रईस शेख, मुख्याध्यापक पांडुरंग पटारे, प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड, उपप्राचार्य सुयोग थोरात, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे आदी उपस्थित होते.स्पर्धेत शेख इरफान (श्री. ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज,संगमनेर) याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक खताळ अक्षदा संजय (रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर) हिला मिळाला तर तृतीय क्रमांक अंगारखे अंजली ज्ञानेश्वर(कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अशोकनगर) हिला मिळाला. उत्तेजनार्थ क्रमांक आल्हाट संजना संदेश (सेवा नर्सिंग कॉलेज, श्रीरामपूर), राऊत श्रद्धा शरद (कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशोकनगर) राऊत अपूर्वा प्रफुल्ल (रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय,श्रीरामप ूर) यांना मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दिलीप खंडागळे यांनी केले. आभार प्रा. संगीता खंडिझोड यांनी मानले. परीक्षक म्हणून प्रा. प्रकाश साबळे व प्रा. संदीप जावळे यांनी काम पाहिले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
वक्तृत्व कलेमुळे होतो व्यक्तिमत्वाचा विकास- मुरकुटे:अशोकनगर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात, विजेत्यांना पारितोषिकांचे केले वितरण