Headlines

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप:सहा संशयित ताब्यात, रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू




नागपूर जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणीवर वर्धा रेल्वे स्थानक परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती असून, या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीने चौकशीदरम्यान सहा जणांची ओळख पटवल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीने चंद्रपूर येथे आपल्या काकांकडे जाणार असल्याचे वडिलांना सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिचे वडील तिला सोनेगाव (बेला) येथील बसस्थानकावर घेऊन गेले. तेथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून त्यांनी तिला रवाना केले. तरुणी चंद्रपूर येथे काकांकडे गेल्यानंतर बुधवारी रात्री चंद्रपूरहून जयंती एक्स्प्रेसने वर्ध्याकडे निघाली. रात्री उशिरा ती सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरली. मध्यरात्रीच्या सुमारास, अंदाजे दीड वाजता, तिने ऑटो रिक्षाने वर्धा रेल्वे स्थानक गाठले. रेल्वे स्थानक परिसरात संशयितांनी गाठल्याचा आरोप वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर एका संशयित युवकाने तरुणीला ऑटोमध्ये बसवले. त्यानंतर त्याने आपल्या आणखी पाच साथीदारांना बोलावून घेतल्याचा आरोप आहे. या सहा जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. घटनेनंतर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास रेल्वे लोहमार्ग पोलिसांना एका तरुणीवर अत्याचार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पीडितेचा शोध घेण्यास सुरुवात केली. शहरात फिरताना पोलिसांना सापडली पीडिता पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित तरुणी शहरात फिरताना रेल्वे पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वडिलांना बोलावून घेण्यात आले. दरम्यान, घटनेतील संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी दहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात आणले. त्यापैकी सहा जणांची पीडितेने ओळख पटवल्याचे पोलिसांनी सांगितले. या सहा संशयितांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या भूमिकेबाबत पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित १९ वर्षीय तरुणीवर यापूर्वी तिच्या गावातील दोन व्यक्तींनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. त्या घटनेनंतर तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. ती अनेकदा कोणालाही न सांगता घराबाहेर जाणे आणि परत येणे अशा परिस्थितीत राहत असल्याचीही माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर ती चंद्रपूरहून परतत असताना वर्धा रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली आणि त्यानंतर तिच्यासोबत ही घटना घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या सहा संशयितांची चौकशी केली जात असून, घटनेचा नेमका क्रम, संशयितांची भूमिका आणि इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे. पीडित तरुणीच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा… ‘नजर लागण्यावर माझा विश्वास नाही’:तुकाराम मुंढेंचा स्पष्ट संदेश, ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्टबद्दल प्रीती झिंटाचे मानले आभार अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छता आणि आरोग्यास घातक पदार्थांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईची चर्चा सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत होत असून, अभिनेत्री प्रीती झिंटा हिने ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर असलेला टी-शर्ट परिधान करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *