![]()
तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, तो दूर करायचा असेल तर एक पूजा घालावी लागेल, असे सांगत भोंदू बाबाने 17 वर्षांच्या तरुणीवर आपल्याच घरात अत्याचार केला. त्यामुळे पीडीता 3 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेच्या तक्रारीवरून भोंदूविरोधात पोक्सो आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार लातुरातील विवेकानंद चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रामेश्वर हणमंतराव रामदासी (40) असे अटकेतील भोंदूचे नाव आहे. लातुरातील मुलीचे लग्न जुळत नसल्यामुळे तिचे आई वडिल चिंताग्रस्त होते. परिचयातील काही लोकांनी रामेश्वर रामदासी हा महाराज यावर मार्ग काढतो अशी माहिती त्यांना दिली. त्यामुळे पीडीत मुलीचे पालक त्याच्याकडे गेले असता त्याने मुलीची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत कुंडली दोष आहे, यासाठी पुजा घालावी लागेल असे सांगीतले. त्यामुळे जून 2026 मध्ये भोंदू तिच्या घरी गेला. भोंदूने वरच्या मजल्यावरील खोलीत पुजा मांडली. तर मुलीच्या आई वडिलांना दुसऱ्या खोलीत बसवले. नंतर खोलीचा दरवाजा लावल्यानंतर भोंदूने पीडीत मुलीला कुंडली दोष काढायचा असेल तर माझ्याशी शारिरिक संबंध ठेवावे लागतील, ही बाब कोणाला कळाली तर कुंडली दोष निघणार नाही असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. पीडीता 3 महिन्यांची गर्भवती या घटनेला 3 महिने उलटल्यानंतर पीडीता 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भोंदूविरोधात गुरनं 681/26 कलम 64(2)(एम) बीएनएस, सह कलम 4,6,8,12 पोस्को, सहकलम 3(2)अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. पीडीता 3 महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे आरोपीची आणि गर्भाची डिएनए चाचणी करण्यात येणार आहे.भोंदूला न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली,असे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले. भोंदू दहावी पास, पीडितेचे आई-वडील कष्टकरी या घटनेतील भोंदू महाराज विवाहीत असून तो केवळ दहावी पास आहे. पूजा अर्चा करुन कुंडली पाहण्याचे आणि दोष दूर करण्याचे तो दावे करतो. पीडीत मुलीचे पालक कष्ट करुन उपजीविका भागवतात तर पीडिता अकरावीच्या वर्गात आहे. कुंडलीत दोष असल्याचे दावे करुन त्याने या कुटुंबाला त्याने गळाला लावले, त्यांच्याकडून पैसेही उकळले आणि मुलीवर अत्याचार केला.
Source link
कुंडली दोषाच्या नावाखाली 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार:लातूरमध्ये बोगस महाराजाला अटक, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती