![]()
शहरात परंपरागत पद्धतीने गणेशोत्सव व श्रींच्या विसर्जन मिरवणुकीचे शिस्तबद्ध आणि कुशलतेने संचालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गतवर्षी उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना तसेच मिरवणुकीत भोजन व जलपान सेवा देणाऱ्या विविध सामाजिक
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गो सन्मान अभियानाचे राज्य प्रभारी महंत मनीष महाराज (चंद्रपूर), राज्य सहप्रभारी महंत त्र्यंबक गिरी महाराज, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, नगरसेवक निलेश देव, मंडळाचे कार्याध्यक्ष हरीश अलीमचंदानी, उपाध्यक्ष मनोहर पंजवानी, केशवराव पातोड, मनोज खंडेलवाल, महासचिव सिद्धार्थ शर्मा, ॲड. सुभाषसिंह ठाकूर, विजय तिवारी, सचिव संतोष पांडे, नीरज शाह, मंगेश काळे, जयंत सरदेशपांडे, दिलीप खत्री आदी मान्यवर उपस्थित होते. गणरायाच्या आरतीने सोहळ्याचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते विविध स्मृती पुरस्कारांच्या माध्यमातून मंडळांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह (शील्ड) बहाल करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात ॲड. मोहता यांनी गणेशोत्सव शांततेत आणि शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्याचे सांगितले. प्रास्ताविक विजय तिवारी यांनी केले. प्रथम सत्राचे संचालन जयंत सरदेशपांडे यांनी केले. पुरस्कार वितरणाचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. आभार केशवराव पातोड यांनी मानले.
स्मृती पुरस्कार प्राप्त मंडळे विविध मान्यवरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील उत्कृष्ट मंडळांना रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्व. कमलादेवी खेतान स्मृती: जय भवानी व्यायाम शाळा (शिवापूर), बाल गणेशोत्सव मंडळ (कच्ची खोली, सिंधी कॅम्प). स्व. गोदावरीदेवी मोहता स्मृती: विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळ, राजराजेश्वर गणेशोत्सव मंडळ. स्व. कृष्णादेवी ठाकूर स्मृती: संघर्ष गणेशोत्सव मंडळ, युवा क्रांती गणेशोत्सव मंडळ (द्वारका नगरी). स्व. परियलदास पंजवाणी स्मृती: शहीद चंद्रशेखर आझाद गणेशोत्सव मंडळ (माळीपुरा), नवयुवक गणेशोत्सव मंडळ (शिवर). स्व. मंगेशभाऊ गावंडे स्मृती: समाजसेवा गणेशोत्सव मंडळ (डाबकी रोड), रामदासपेठचा राजा मंडळ. स्व. प्रशांत अलीमचंदानी स्मृती: आदर्श गणेशोत्सव मंडळ (आळशी प्लॉट), जंगा हनुमान गणेशोत्सव मंडळ (खोलेश्वर). स्व. सुरेंद्र शाह स्मृती: टीव्हीएस डेल्टा मंडळ (नेहरू पार्क), लालबागचा राजा एकता मंडळ, जुना कपडा बाजार मंडळ, लहरी गणेशोत्सव मंडळ, वीर हनुमान मंडळ. यासह विश्वकर्मा मंडळ, रिद्धी-सिद्धी मंडळ, गणराज मंडळ, ओंकार मंडळ, श्रीमंत गणेश मंडळ (एस. एस. जीन), वर्धमान भवन, नेताजी सुभाषचंद्र बोस मंडळ व राजूरकर कंपाऊंड मंडळाचा सन्मान करण्यात आला.