नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. येवला येथे गणेश मंडळांना भेट देत असताना, अनेक विसर्जन करायचे आहेत, आधी गणपती बाप्पाचे विसर्जन करू या… मग बाकीचे बघू! असे विधान त्यां
.
येवला दौऱ्यावर असताना आमदार सुहास कांदे यांनी शहरातील ‘शिवशंभो वॉरियर्स गणेश मंडळाला’ भेट दिली. यावेळी त्यांनी गणरायाची आरती करून दर्शन घेतले आणि येवलेकरांचे दुःख दूर करावे, असे साकडंही बाप्पाला घातले. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले.
विशेष म्हणजे, येवला हा महायुतीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे आमदार कांद्यांच्या या ‘विसर्जन’ रुपी वक्तव्याचा संदर्भ नेमका काय असावा, याबाबत राजकीय पक्षांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र, या विधानामागचा रोख स्पष्ट झालेला नाही.
शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सरसकट पंचनामे होणार
आमदार सुहास कांदे म्हणाले की, दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी शेतीपिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रक्रियेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हे ही वृत्त वाचा गणेश विसर्जन शिस्तबद्ध करा:दुष्काळग्रस्तांना सरकार लवकरच मदत देणार, दगडूशेठच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांचे आश्वासन

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दगडूशेठची विधीवत पूजा आणि अभिषेक केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुणेकरांना पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन केले, तसेच राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत बळीराजाला मोठा दिलासा दिला.
‘पुण्याचे विसर्जन जगभरात प्रसिद्ध’
पुण्याच्या गणेशोत्सवाचे आणि इथल्या परंपरेचे कौतुक करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पुण्यातले गणेशोत्सव आणि विसर्जन हे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे विसर्जन बघण्यासाठी जगभरातील लोक आतुरतेने वाट पाहत असतात. पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर ती श्रद्धा, संस्कृती आणि अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्याचे दर्शन आजच्या दिवशी घडते.” त्यांनी सर्व गणेश मंडळे आणि पुणेकरांना विनंती केली की, यंदाचे विसर्जन अतिशय चांगल्या पद्धतीने, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कृत्रिम कुंडामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणपूरक विसर्जन करावे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. वाचा सविस्तर