![]()
गणेश विसर्जनासाठी श्रीरामपूर नागरोरिषदेमार्फत कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या पथकाने घरगुती आणि सार्वजनिक १ हजार ९९५ मूर्ती आणि सुमारे ३ हजार २२५ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले होते. नागरिकांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन नगरपरिषदेने नमूद केलेल्या ठिकाणीच करावे असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे , उपनगराध्यक्षा कांचन सानप यांनी केले होते. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन मोहीम राबवण्यात आली होती. त्यासाठी प्रशासनाने शहरातील अंबिका महिला पतसंस्था, कांदा मार्केट, थत्ते मैदान या ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. डावा व उजवा तट कालवा येथे दहावा ओटा परिसर, नॉर्दन ब्रँच परिसर, अक्षय कॉर्नर, दळवी वस्ती, काळाराम मंदिर कॅनॉल जवळ, सरस्वती कॉलनी ब्रीजजवळ, गोंधवणी रोड कॅनॉल ब्रीजजवळ, खबडी जवळील कॅनॉल ब्रीजजवळ आदी ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. नॉर्दन ब्रंच परिसर, अक्षय कॉर्नर या ठिकाणी दोन जनरेटर, लाईटिंग तसेच ४०० मीटर बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मूर्ती संकलनासाठी १२ वाहने आणि निर्माल्य संकलनासाठी ४ वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. या सर्व कामासाठी ३५० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संकलित केलेल्या मूर्तींचे बेलापूर आणि शिरसगाव येथे विसर्जन करण्यात आले. प्रांताधिकारी किरण सावंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक विशाल खैरे आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेऐवजी ढोल, लेझीम,झांज, बँड आदीसारख्या वाद्यांना प्राधान्य देण्यात आले होते. काही मंडळानी विविध शौर्य प्रात्यक्षिकही ठेवले होते. मिरवणुकीत प्रबोधनपर देखावे सादर करण्यात आले होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार हेमंत ओगले यांचेसह नगराध्यक्ष करण ससाणे यांचेसह विविध मान्यवरांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला होता. त्यांचा उत्साह पाहून अनेक नगरसेवक, विविध पदाधिकारी यांचेसह अनेक नागरिक, गणेशभक्तही सामील झाले होते. श्रीरामपूरात विसर्जनासाठी नगरपरिषदेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती.
Source link
पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रीरामपुरात बाप्पाला निरोप:"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' जयघोषाने दुमदुमले शहर