![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या लढ्याला एक मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या दबावामुळे आणि पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर, येत्या २
.
‘सरकारने दुर्लक्ष केल्यास सत्याग्रह होणारच’
रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी सत्याग्रह पुण्यात पत्रकार संघानजीक असलेल्या एस. एम. जोशी पुलाजवळ होणार आहे. या सत्याग्रहाला अद्याप ५ दिवसांचा अवधी आहे. “तोपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, तर हा सत्याग्रह स्थगित होऊ शकतो. परंतु, सरकार जर ढिम्म राहणार असेल आणि केवळ विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मात्र कोणत्याही परिस्थितीत हा सत्याग्रह होणार म्हणजे होणारच,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच, MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांच्या विसर्जनासह अन्य सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा अन् पालकांना आवाहन
अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आंदोलनात सहभागी झाल्यास किंवा व्यक्त झाल्यास कारवाईची भीती असते. यावर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. “आता पोलिसांनीच रीतसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मीडियावर, टेलिग्राम चॅनेलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झाले, तरी कुणावरही कारवाई होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्धास्तपणे व्यक्त व्हावे आणि आपल्या हक्कांसाठी बोलावे,” असे पवार म्हणाले.
याचबरोबर, केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनीही या लढ्यात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. “आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी आणि स्वच्छ व पारदर्शक प्रशासनासाठी पालकांनीही या सत्याग्रहात सहभागी व्हावे,” अशी साद रोहित पवार यांनी घातली आहे. आता २ ऑक्टोबरच्या आत राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
रोहित पवारांची पोस्ट..