Headlines

गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया सुलभ करा:व्यावसायिक अभियंता व वास्तुविशारद संघटनेचे मनपा आयुक्तांना 11 मागण्यांचे निवेदन




छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि जलद करण्याची मागणी व्यावसायिक अभियंता व वास्तुविशारद संघटनेने केली. त्यांनी मनपा आयुक्तांना ११ मागण्यांचे निवेदन दिले. एजंटकडून फसवणूक टाळण्यासाठी नोंदणीकृत वास्तुविशारद व अभियंत्यांची यादी जाहीर करावी, चलन बुक उपलब्ध करून द्यावे. चलन फक्त एचडीएफसी बँकेत भरता येते; ती इतर बँका व मनपा झोन कार्यालयांमध्येही सुरू करण्याची मागणी आहे. ९०० चौ.मी.पर्यंतच्या प्रकरणांना नगररचनाकार स्तरावर मंजुरीचे अधिकार द्यावेत. गुंठेवारी कक्षातील मनुष्यबळ वाढवून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. फाईल दाखल केल्यावर तात्काळ पावती मिळावी. गुंठेवारीसाठी ‘सिंगल विंडो’ सुरू करावा. BPMS प्रणालीतील अडचणी दूर कराव्यात. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल व मनपाच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *