Headlines

आ. अनुराधा चव्हाण यांचा फुलंब्री तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा:नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आमदारांचे आश्वासन‎




फुलंब्री तालुक्यात पावसाअभावी झालेल्या पिकांच्या गंभीर नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी रविवारी शेलगाव, गेवराई गुंगीसह विविध गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतावर जाऊन मका आणि कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. दौऱ्यादरम्यान हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ‘दुष्काळ जाहीर झाला, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार?’ असा उद्विग्न सवाल करत आमदारांसमोर आपला संताप आणि टाहो फोडला. पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची आपबिती शेतकऱ्यांनी मांडली. निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना दिलासा देताना आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या, ‘सरकार या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कृषी व महसूल प्रशासनामार्फत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ या दौऱ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ वाघ, सविता कोलते, माजी सभापती सविता फुके, अजिनाथ सोनवणे, गणेश तांबे यांच्यासह उपविभागीय अधिकारी पूजा वंजारी, तहसीलदार योगिता खटावकर, नायब तहसीलदार संजीव राऊत, कृषी अधिकारी पंकज वाकळे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *