Headlines

रस्त्यासाठी सिमेंट घेऊन जाणारे टँकर वेताळवाडीच्या घाटामध्येच अडकले:नागद-फर्दापूर रस्त्याच्या कामासाठी सिमेंट घेऊन जाताना घडली घटना‎




नागद-फर्दापूर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सिमेंट घेऊन जाणारे दोन टँकर वेताळवाडी घाटातील वळणावर गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले आहेत. यातील एका टँकरचे वळण घेताना नियंत्रण सुटल्याने तो दरीपासून अवघ्या तीन फुटांवर थांबला. चालक अजिफ अली (रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. नागद-फर्दापूर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सिमेंट वाहून नेणारे (एमएच ३४ सीक्यू २०१९) आणि (एमएच ३४ सीक्यू २९४६) क्रमांकाचे टँकर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वेताळवाडी घाटात अडकले. दोन दिवसांपासून हे टँकर घाटातच अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अजिंठा घाटात वाहतूक कोंडी झाल्यास संभाजीनगरकडे जाणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *