![]()
जिल्ह्यातील ३६ पैकी २४ साखर कारखाने खासगी भांडवलदारांकडे आहेत. अनेक ठिकाणी काटा मारण्याचे प्रकार चालतात आणि जास्तीचा ऊस दर दिला, असा बोभाटा केला जातो, याकडे ऊस उत्पादकांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. दुष्काळामुळे साखर कारखानदारी अधिकच अडचणीत येण्या
.
अकलूज येथील सहकारमहर्षी साखर कारखाना यंदाच्या हंगामातील गळीत झालेल्या उसाला जिल्ह्यात जास्तीचा ऊस दर देण्यात कोणती कसर ठेवणार नसल्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते -पाटील यांनी दिली. सहकारी कारखानदारीसमोरील आव्हाने पाहता शासनाने सहकारी साखर कारखान्यांना प्रतिटन एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केले . सहकार महर्षी कारखान्याच्या यंदाच्या हंगामातील ऊसाची पहिली मोळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत टाकून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर झालेल्या सभेत जयसिंह बोलत होते .
जयसिंह मोहिते – पाटील म्हणाले की , हा कारखाना यंदा नऊ लाख टनापर्यंत उसाचे गाळप करेल. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्याने नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कामगारांना ११ टक्के बोनस जाहीर केला. सध्या सहकारी साखर कारखान्यासमोर खासगी भांडवलदारांचे मोठे आव्हान उभे आहे.
या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते – पाटील ,माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील ,उपाध्यक्ष शंकरराव माने देशमुख ,संचालिका स्वरुपाराणी मोहिते – पाटील ,द ग्रीन फिंगर्स मेडिकल कॉलेज चे अध्यक्ष विश्वतेजसिंह मोहिते -पाटील , कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह सर्व संचालक, शेतकरी उपस्थित होते. संचालक जयदीप व त्यांच्या पत्नी शीतल या उभयतांच्या हस्ते पूजा झाली .डॉ . सुभाष कटके यांनी आभार मानले . माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते बटन दाबू टाकली गव्हानी मोळी. यावेळी मान्यवर.