![]()
सध्याच्या स्थितीत ७५ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी दुष्काळी परिस्थिती हाताळणाऱ्या ११ विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असून लवकरच मदतीचा योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ता. २८ दिली आहे. हिंगोली जिल्हयातील आराटी येथे त्यांनी शेतात पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार संतोष बांगर, आमदार प्रज्ञा सातव, माजी आमदार गजानन घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, राज्यामध्ये शेतीची भिषण परिस्थिती आहे. शेतातील सोयाबीन पिक हातचे गेले आहे तर कापूस व इतर पिकांनाही फटका बसला आहे. कापसाचे पिक वरून हिरवे दिसत असले तरी खाली पाते, बोंडे लागलेलेच नाहीत. राज्यातील ७५ टक्के भाग दुष्काळात सापडला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक भागात पाहणी केली जात आहे. त्यानंतर मदतीबाबत अभ्यास केला जाणार आहे. विमा, एनडीआरएफचे निकषानुसार मदत यातून जे जास्त देता येईल ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक पिकनिहाय काय मदत करणे अपेक्षीत आहे याची माहिती सरकारला दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुष्काळ हाताळणाऱ्या महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, विज कंपनी, पशुसंवर्धन विभाग, जलविभाग यासह ११ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबत काही जिल्हयात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देखील काढले आहे. सर्व क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी व कर्मचारी गावात राहिले तर वस्तुनिष्ठ पंचनामे होतील असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पुढील काही दिवसांतच पंचनामे पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने अडवला बावनकुळेंचा ताफा राज्यात शेतकऱ्यांना मदत जाहिर करावी, मुख्य निवडणुक आयुक्तांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे कार्यालयासमोरून जात असतांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे १० मिनीटे त्यांचा ताफा अडविला त्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. आजच्या आज दुष्काळी मदत जाहीर होणार नाही:पंचनामे-संपूर्ण अहवालानंतरच मदतीचा निर्णय; दुष्काळाचे राजकारण नको- बावनकुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आजच्या आज मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय:11 विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द, बावनकुळे म्हणाले- सरकार संवेदनशील