![]()
महावितरणचे संचालक सचिन तालेवार यांनी छत्रपती संभाजीनगर व लातूर परिमंडलात दुष्काळी परिस्थितीत कृषीसह सर्व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचे निर्देश दिले. सोमवारी (28 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर येथे तालेवार यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेतली. यात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कृषी ग्राहकांना किमान 8 तास, तर अकृषी ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा मिळावा. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, वाहिनीचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्या, असे तालेवार म्हणाले. देखभाल-दुरुस्तीची कामे तात्काळ करा, अनधिकृत वीजवापर थांबवा. लोकप्रतिनिधींशी संवाद साधा. प्रणाली सक्षमीकरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व वीजहानी कमी करण्याच्या योजनांना गती द्या, असेही ते म्हणाले. ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू आहे. नवीन वीजजोडणी, नादुरुस्त रोहित्र बदलणे, बिलावरील नावात बदल यांसारखी कामे यात होतात. अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे तालेवार म्हणाले.
Source link
महावितरण संचालकांचे दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश:छत्रपती संभाजीनगर आणि लातूर परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिल्या सूचना