![]()
मुकुंदवाडीत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या दांपत्यांनी एका महिन्याच्या बाळाचा 1.20 लाखांत सौदा केला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बाळाला साडेतीन लाखांत हैदराबाद येथे विकले होते. बाळाचे आईवडील, सीमा रेशवाल, तिची आई कौशल्या पवार, संगीता आव्हाड (पडेगाव), डॉ. सुरेश गुंटुका (रा. पिग्गेरला, तेलंगणा) आणि उमा गंगाधर खटकम (रा. तालागड, हैदराबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. दरम्यान, उमाने दीड महिना बाळाचा सांभाळ केला. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वतःहून ते बाळ ठाण्यात आणले. बाल कल्याण समितीच्या आदेशाप्रमाणे साकार संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार डॉ. गुंटुका हा 12 वी नापास आहे. तरीही अनुभवाच्या प्रमाणपत्रावर तो तेलंगणात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता. शहरातील आयव्हीएफ सेंटर्समध्ये रुग्णांना आणण्याच्या निमित्ताने त्याचे शहरात येणे-जाणे होते. त्याच्या भावाच्या मेहुण्याला बाळ नसल्याने त्याने बाळ घेण्यास होकार दिला. या वेळी संगीता आणि सीमा यांनी कायदेशीर प्रक्रिया करून देण्याची थाप मारली. त्यामुळे सुरेशने मध्यस्थी करत हे बाळ भावाची मेहुण्याची पत्नी उमाला सुपूर्द केले होते. बाळाच्या विक्रीच्या सौद्याचे टप्पे असे पहिला सौदा : जन्मदात्यांनी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन बाळ सीमा रेशवालला दिले.
दुसरा सौदा : सीमाने हे बाळ पडेगाव येथील संगीता आव्हाड हिला 2 लाख 70 हजार रुपयांत विकले.
तिसरा सौदा : संगीताने नांदेड गाठून बोगस डॉक्टर सुरेश गुंटुका याला बाळ 3 लाख 50 हजारांत विकले.
चौथा टप्पा: डॉ. सुरेशने हे बाळ हैदराबाद येथील नातेवाईक उमा खटकम हिला साडेतीन लाखांतच सुपूर्द केले. पोलिसांनी दागिने व मोबाइल जप्त केले बाळ विकून मिळालेल्या 1 लाख 20 हजार रुपयांतून जन्मदात्यांनी 25 हजारांचा मोबाइल आणि 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले, तर मध्यस्थ सीमा रेशवाल हिने स्वतःकडे 1 लाख 10 हजार ठेवून आईला 40 हजार दिले. पोलिसांनी दागिने व मोबाइल जप्त केला आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगरात एका महिन्याच्या बाळाची 3 वेळा विक्री:बारावी फेल बोगस डॉक्टरसह 7 जणांना ठोकल्या बेड्या,बाळ विकल्यावर जन्मदात्याकडून मोबाइल, सोन्याचे दागिने खरेदी