![]()
सीजेपीने काढलेल्या मोर्च्यात ठाकरे बंधू सामील झाले आणि तो मोर्चा आपणच काढल्याचा दावा केला. आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात ते मोर्चा काढत आहेत. मात्र, असे मोर्चे काढून जनाधार मिळत नाही; त्याऐवजी जनतेचा पाठिंबा आहे की नाही, हे त्यांनी तपासावे, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी यांनी लगावला. तसेच, दोन्ही भावांनी एकत्र येऊन आधी आपले घर सांभाळावे, अशीच जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 1 हेक्टरच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना मदत दिली होती, तर आमचे सरकार 2 हेक्टरपर्यंत मदत करते. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक निधी देण्यासोबतच शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असून दुष्काळसंदर्भात मदतही जाहीर केली आहे. प्रसिद्धीसाठी व्यक्तव्य करतात रावसाहेब दानवे म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या मोर्च्यात त्यांच्या जवळच्या लोकांवितिरिक्त कोणीही येणार नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि घटनात्मक संस्थांवर टीका करतात. जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी केवळ प्रसिद्धीसाठी ते माध्यमांसमोर येतात. ‘इंडिया’ आघाडी ही केवळ नावापुरतीच असून महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेला विचारतही नाही, तर काँग्रेस स्वतंत्रपणे मोर्चे काढत आहे. मविआतील हे तिन्ही पक्ष पूर्णपणे वेगळे असून ते केवळ निवडणुकीपुरते एकत्र येतात. काँग्रेसकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सातत्याने नवनवीन मुद्दे उपस्थित करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहे. निवडणुकीनंतर इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले, तेव्हा निवडणूक आयोगाने सर्वांना इव्हीएम हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिले होते; परंतु आरोप करणारे त्यावेळी समोर आले नाहीत. त्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयांवर आणि पंतप्रधानांवरही आक्षेप घेतला. काँग्रेसचा मतदारांवर, न्यायालयावर आणि इव्हीएमवरही विश्वास नाही. काँग्रेसच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त असलेले मनोहरसिंह गिल निवृत्तीनंतर काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार आणि केंद्रात मंत्री झाले, यावरून त्यांचे कामकाज स्पष्ट होते. 70 वर्षे विरोधात राहूनही आम्ही कधी निवडणूक आयोगावर निराधार आरोप केले नाहीत, तर राहुल गांधी केवळ कागदावर लिहून आणलेले मुद्दे वाचतात, त्यांना स्वतःहून काहीही बोलता येत नाही, असा हल्लाबोल दानवे यांनी केला. हे ही वृत्त वाचा निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला का त्रास होतोय?:’शिवतीर्था’वरून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची संयुक्त गर्जना; 4 ऑक्टोबरला भायखळा ते मुंबई महापालिकेपर्यंत विराट जनमोर्चा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर अत्यंत ऐतिहासिक राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद घेत 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली. “हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा सत्तेच्या स्पर्धेचा नसून, देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, सर्वांच्या हातात फक्त राष्ट्रध्वज तिरंगाच फडकेल,” अशी साद दोन्ही ठाकरे बंधूंनी तमाम जनतेला आणि सर्वपक्षीय नेत्यांना घातली आहे. वाचा सविस्तर
Source link
ठाकरेंनी मोर्चा काढण्यापेक्षा मतदार सोबत आहेत का तपासावे:मविआतील 3 पक्ष निवडणुकीपुरते एकत्र येतात, महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेला विचारते का?- रावसाहेब दानवे