Headlines

टंचाई दारात; आराखडा मात्र कागदावरच!‎:जिल्ह्यात 137 टँकरने 2 लाख 53 हजार नागरिकांची तहान भागवली जातेय‎




दोन वर्षे सप्टेंबरअखेर टँकरमुक्त राहिलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. सध्या १२९ गावे आणि ७०१ वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ५३ हजार ५६३ नागरिकांची तहान १३७ टँकरद्वारे भागवली जात आहे. पाऊस सरासरीच्या अवघ्या ६६ टक्क्यांवर थांबल्याने पुढील महिन्यांत टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असतानाच, या संकटाचा सामना करण्यासाठीचा टंचाई आराखडा मात्र अद्याप पूर्ण झालेला नाही. म्हणजे टंचाईने गावोगाव धडक दिली, टँकर सुरू झाले; पण पुढील संकटासाठीचे प्रशासनाचे नियोजन अजून तालुकास्तरावरच अडकले आहे. आजअखेर जिल्ह्यात सुमारे ४४८ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २९९ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ६६ टक्के आहे. त्यामुळे पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत असल्याने टँकरची गरज निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची परिस्थिती किती गंभीर आहे, हे टँकरच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. सप्टेंबरअखेर २०२४ आणि २०२५ मध्ये जिल्ह्यात एकही टँकर नव्हता. यंदा मात्र ही संख्या थेट १३७ वर पोहोचली आहे. त्यापैकी १३३ टँकर खासगी असून पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६५ टँकर सुरू आहेत. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. आराखडा का गरजेचा? टंचाई आराखड्यात पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा आणि अंदाजे खर्चाचा समावेश केला जातो. बुडक्या खोदणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकर, प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आणि विंधन विहिरींची दुरुस्ती अशा उपाययोजनांचा त्यात समावेश असतो. आराखडा वेळेत तयार झाला तर टंचाई वाढण्यापूर्वी उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा होतो. सध्या ७७ हेक्टरवर चारा, डिसेंबरपर्यंतच पुरणार? पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे १६ लाख मोठे पशुधन असून दररोज सुमारे ४३ लाख लिटर दूध उत्पादन होते. सध्या ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उपलब्ध असून तो डिसेंबरपर्यंत पुरेल, असा अंदाज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डी. बी. दिघे यांनी व्यक्त केला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून उन्हाळी चारा पिकांसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. Q: टंचाई आराखडा का रखडला? A: उपअभियंत्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे आराखडा रखडलेला नाही. २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत चर्चा करून तो करण्याबाबत सूचना दिली आहे. Q : कोणत्या उपाययोजनांचा समावेश? A: ग्रा.पं. आणि ग्रामस्थांशी संवाद साधून टँकरबरोबरच नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि तात्पुरते नळ कनेक्शन यावर सूचना घेऊन आराखडे पाठवण्याच्या सूचना तालुक्यांना दिल्या आहेत. Q: केव्हापर्यंत तयार होणार? A: “स्थानिक पातळीला सूचना दिल्या आहेत. आठ दिवसांत आराखडे तयार होऊ शकतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *