वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर आपली वेगळी भूमिका मांडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान करायचा असेल, तर औरंगाबादचे नाव बदलण्याऐवजी पुणे शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, अशी मागणी त्यांनी केली.
.
‘पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्या’
सुजात आंबेडकर म्हणाले की, औरंगाबादचे नाव ‘औरंगाबाद’च राहावे आणि पुण्याला ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव द्यावे. स्वतःचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाल्याचा उल्लेख करत त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांच्या मते, छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानाचा विचार करताना नामांतराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.

पुण्यातील सामाजिक घटकांवरही सवाल
या मुद्द्यावर बोलताना सुजात आंबेडकर यांनी पुण्यातील काही सामाजिक घटकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर तो संबंधितांना मान्य होईल का, असा सवाल त्यांनी केला. तसेच कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे लोक या प्रश्नावर काय भूमिका घेतील, यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय चर्चेला उधाण
सुजात आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सुरू असलेल्या नामांतराच्या चर्चेला नवा मुद्दा मिळाला आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा..
उरलेल्या सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश करणार: CM फडणवीसांची घोषणा; म्हणाले- मंडळ स्तरावर जाऊन सरसकट मदत

राज्यातील दुष्काळाच्या तीव्रतेवरून आणि काही तालुके दुष्काळी यादीतून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. “पहिल्या टप्प्यात 265 तालुक्यांची घोषणा झाल्यानंतर राहिलेल्या आणि खरोखर पिके करपलेल्या सर्वच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. निकषांच्या तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, कार्यकाळ पूर्ण करून परतणाऱ्या पहिल्या बॅचमधील अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दल आणि तत्सम सुरक्षा दलांमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सविस्तर वाचा