![]()
महानगरपालिकेच्या स्थापनेला १ ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. मनपाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शहराच्या विकासाच्या वाटचालीसोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या
.
अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आणि नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. त्यांच्या संघर्षाच्या आणि त्यागाच्या स्मृती जतन करण्यासोबतच त्यांचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश प्रदर्शनामागे आहे. ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ प्रदर्शनात स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे, त्यांचे कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान याबाबतची माहिती मांडण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ पुस्तकांमधून वाचलेला इतिहास प्रत्यक्ष छायाचित्रे आणि ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला संघर्ष, त्याग आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान यांची माहिती या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. विशेषतः आजच्या पिढीला स्थानिक इतिहासाची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांच् या त्यागाची माहिती केवळ स्मरणदिनापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांपर्यंत आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. हुतात्मा स्मारक येथे आर्वजून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा- महाविद्यालयांनी प्रदर्शन बघण्यास विद्यार्थ्यांना आणावे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन आवर्जून दाखवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती प्रत्यक्ष ऐतिहासिक छायाचित्रांच्या माध्यमातून मिळणार असल्याने शैक्षणिक दृष्टिकोनातूनही या प्रदर्शनाला महत्त्व आहे.
कुटुंबासह भेटीचे आवाहन हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे प्रदर्शन नसून अकोल्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिक, युवक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नीलेश देव यांनी केले आहे.