Headlines

Nagpur BJYM Protest; Rahul Gandhi Effigy Taken To Mental Hospital


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिका आणि विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) कार्यकर्त्यांनी नागपुरात आक्रमक पवित्रा घेत एक अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा एक प्रतिकात्मक पुतळा तयार करून तो थेट नागपू

.

आंदोलनाचे कारण काय?

नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांचा ‘मेंदू चोरीला गेला आहे’, असे खोचक वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आणि त्यांच्या विधानाचे समर्थन करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी हे प्रतीकात्मक आंदोलन छेडले.

मनोरुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मनोरुग्णालयाच्या परिसरात राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिका, त्यांची विधाने आणि काँग्रेसच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या पुतळ्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याचे हे नाट्य रंगवण्यात आले.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आणि राहुल गांधी यांच्या राजकीय कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनामुळे नागपूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा..

बैलगाडीभर आरोप तरीही अध्यक्ष पदावर कायम?:पदाला गोचिडासारखं चिकटलेल्या MPSC अध्यक्षांना हटवा, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला असून, राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. “MPSC च्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे दररोज बैलगाडीभर आरोप होत आहेत. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही आणि ते पदाला गोचिडासारखे चिकटून बसणार असतील, तर राज्य सरकारने त्यांना तातडीने पदावरून हटवावे,” अशी आक्रमक मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.