![]()
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा तिसरा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात तब्बल ३ हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. बँकांकडून लावण्यात आलेल्या वाढीव व्याजदराचा तिढा सुटल्याने ही रखडलेली प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. वाढीव व्याजदरामुळे रखडली होती प्रक्रिया राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पहिल्या दोन टप्प्यांत तब्बल १० हजार ११५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीपणे जमा केले होते. मात्र, तिसऱ्या हप्त्याच्या वितरणावेळी एक तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. काही बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर प्रमाणापेक्षा जास्त व्याजदर आकारण्यात आल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. या तफावतीमुळे तिसऱ्या हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवण्यात आले होते. सुधारित माहितीनंतर वितरणास गती या समस्येची दखल घेत सरकारने संबंधित बँकांना आकडेवारी आणि व्याजदराबाबत सुधारित (रिवाईज्ड) माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता अनेक बँकांकडून ही सुधारित माहिती प्राप्त झाली असून, त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या टप्प्यातील ३ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार ज्या बँकांची सुधारित आकडेवारी आणि प्रक्रिया अद्याप बाकी आहे, ती पूर्ण झाल्यानंतर उर्वरित हप्त्याची रक्कमही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होऊ लागल्याने ऐन हंगामात बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
———— ही बातमी पण वाचा.. 5 हजार 29 कोटींची पहिली कर्जमाफी खात्यात:मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 6.22 लाख शेतकऱ्यांना दिलासा; आधार प्रमाणीकरण होताच पैसे जमा होणार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्जखाते आता ‘नील’ (Zero) झाले आहे,” अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी कर्जमाफी योजना, नाशिकमधील रस्ते आणि कुंभमेळ्याची कामे, तसेच राज्यातील इतर राजकीय आणि सुरक्षाविषयक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
शेतकऱ्यांना मोठा दिलासा:कर्जमाफीचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात, 3 हजार कोटींचे वितरण