Headlines

ब्राह्मण समाजाला 'परशुराम भवन'साठी जागा उपलब्ध करून द्या:अखिल भारतीय पेशवा संघटनेची महापौरांकडे मागणी




छत्रपती संभाजीनगर शहरात ब्राह्मण समाजासाठी हक्काचे ‘भगवान परशुराम भवन’ उभारण्यात यावे आणि त्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने महानगरपालिकेचे महापौर समीर राजुरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांच्या आदेशाने आज संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने महापौरांना वरील विषयाचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती संभाजीनगर शहरात साधारण दीड लाख ब्राह्मण समाजाचे मतदार असून, एकूण 3 लाखांहून अधिक समाज बांधव येथे वास्तव्यास आहेत. एवढी मोठी लोकसंख्या असतानाही आज स्थानिक पातळीवर समाजासाठी एकही हक्काचे सभागृह, मंगल कार्यालय, वसतिगृह किंवा अभ्यासिका उपलब्ध नाही. एवढेच नव्हे तर ‘अमृत’ व ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’च्या कार्यालयासाठीही शहरात जागा नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून भगवान परशुराम भवनसाठी योग्य जागा आणि भवन बांधून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. महापौरांकडून सकारात्मक आश्वासन महापौर समीर राजुरकर यांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शवला. तसेच लवकरच अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांच्यासोबत एक विशेष बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख संतोष जोशी, योगेश धर्माधिकारी, शहर प्रमुख काशीनाथ चांदजकर, जिल्हा सचिव रवींद्र पंडित आणि शहर संघटक रामेश्वर सेलुकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख महेश कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *