![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘जल्लोष’ विभागीय सांस्कृतिक युवक महोत्सवात २२ महाविद्यालयांतील ८५० विद्यार्थ्यांनी तब्बल २८ कला प्रकारांत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सटाण्याच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मालेगाव येथील म.स.गा. महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सटाणा येथे झालेल्या या महोत्सवात सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा, नांदगाव, चांदवड व येवला या तालुक्यांतील महाविद्यालयांनी सहभाग घेतला. अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यात पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सागर वैद्य, मविप्र संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी आणि डॉ. सविता कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या महाविद्यालयाला ‘जल्लोष २०२६’चा करंडक प्रदान करण्यात आला. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सागर वैद्य आणि दिलीप दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. स्वामी भिसे यांनी विजेत्यांची घोषणा केली. यावेळी संचालक शालन सोनवणे, विजय पगार, माजी पोलिस उपायुक्त नितीन ठाकरे, डॉ. बी. जी. वाघ, प्रल्हाद सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. नरेंद्र निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली गोसावी यांनी आभार मानले.‘जल्लोष २०२६’मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळविल्याने सटाणा महाविद्यालयाचा संघ आता विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. एकांकिका : प्रथम – ना.म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा, द्वितीय – मविप्र महाविद्यालय नांदगाव. लोकनृत्य : प्रथम – क. ए. सो. महाविद्यालय, कळवण, द्वितीय – ना.म. सोनवणे, सटाणा. साहित्य : प्रथम – मसगा महाविद्यालय मालेगाव, द्वितीय – ना.म. सोनवणे महाविद्यालय, सटाणा. लघु नाटिका : प्रथम – मविप्र महाविद्यालय, नांदगाव, द्वितीय – एसएनजेबी चांदवड. समूह गायन : प्रथम – ना. म. सोनवणे, सटाणा, द्वितीय – मसगा महाविद्यालय मालेगाव. भारतीय स्वर वाद्य : प्रथम – ना.म. सोनवणे सटाणा, द्वितीय – एसएनजेबी इंजिनियरिंग चांदवड. मातीकाम : प्रथम – नामपूर महाविद्यालय, द्वितीय – ना.म.सोनवणे, सटाणा. संगीत विभाग : प्रथम – मसगा महाविद्यालय मालेगाव, द्वितीय – ना. म. सोनवणे, सटाणा. ललित विभाग : प्रथम – ना. म. सोनवणे सटाणा, द्वितीय – नामपूर महाविद्यालय. नृत्य विभाग : प्रथम – मसगा महाविद्यालय मालेगाव, द्वितीय – ना.म.सोनवणे सटाणा.
Source link
सांस्कृतिक महोत्सव:सटाण्यात 28 कला प्रकारांमध्ये 850 विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण