Headlines

कुणाला वाचवायचे, गोवायचे हे आधीच निश्चित:डफरीनच्या अहवालावर संशय, माजी मंत्री डॉ. देशमुख यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; एकांगी अहवालाचा आराेप‎



येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत तीन निष्पाप बालकांचा बळी गेला. या अपघातामुळे राज्यभर गहजब झाला. सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलली. त्याच दिवशी आरोग्यमंत्र्यांना अमरावतीत पाठविले. शिवाय आरोग्य विभागातील उच्चाधिकाऱ्

.

आरोग्य विभागातील उच्चाधिकारी आणि डफरीनमध्ये फायर सेफ्टी सिस्टीम तसेच इलेक्ट्रिकची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या गैरकारभारावर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या मते, ज्या अधिकाऱ्यांनी ही कामे व्यवस्थित करून घ्यायला हवी होती, ते राज्याचे आरोग्य सचिव आणि त्याच विभागाचे आयुक्त यांना या प्रकरणापासून नामनिर्देश ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर इलेक्ट्रिफिकेशन आणि फायर सेफ्टीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची मोठी चूक असतानाही त्यांचा साधा उल्लेखही अहवालात करण्यात आला नाही.

ज्या ठिकाणी स्फोट होऊन आग लागली आणि त्या आगीत तीन बालकांचा बळी गेला, या प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक केल्यास विरोधकांचे तोंड काळे होईल, त्यांना तोंड उघडायला जागा मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून यापूर्वी व्यक्त झाल्या. यावर भाष्य करताना आता विरोधकांना तोंड उघडायला जागा नाही की सत्ताधाऱ्यांना, असा प्रतिप्रश्न डॉ. देशमुख यांनी केला. मुळात संपूर्ण अहवालच सदोष आहे. नि:पक्ष चौकशी केल्यास त्यातील उणिवा स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले. हा चौकशी अहवाल सार्वजनिक केला जाईल, असे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी जाहीर केले होते. परंतु तो अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, डॉ. देशमुख यांनी आपली हातोटी वापरून तो प्राप्त केला. आज, बुधवारी त्यांनी माध्यमांसमोर त्यातील उणिवा उघड केल्या.

कंत्राट एकास, काम दुसऱ्याकडे पॉवर प्वाइंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ, रुग्णांचे नातेवाईक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये झालेला संवाद, असे सज्जड पुरावे सादर करीत डॉ. देशमुख यांनी यावेळी दमदार मांडणी केली. फायर सेफ्टी सिस्टीम, लिफ्ट इन्स्टॉलेशन आणि इलेक्ट्रिफिकेशनचा कंत्राट हा पुणे येथील विनय बदेरा यांच्या मालकीच्या शुभम ईपीसी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात इलेक्ट्रिफिकेशनचे काम अमरावती येथील मनोज ठक्कर यांनी केले आहे. फायर सेफ्टीचे काम नागपूर येथील एस.आर. असोसिएट्सचे रंजन नायर यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांची अहवाल सार्वजनिकची घोषणा हवेत

चौकशी समितीचा अहवाल पोकळ; स्क्रिप्ट आधीच ठरलेली त्यांच्या मते चौकशी समितीने दिलेला अहवाल पोकळ आहे. त्यात केवळ घटनाक्रम दिला गेला. त्यातही काही गोष्टी वास्तवाशी विसंगत नमूद करण्यात आल्या आहेत. जेथे स्फोट झाला, तेथे सीसीटीव्ही असतानाही ते नव्हते, असे म्हटले आहे. ज्या नर्सेसची त्या रात्री ड्युटी होती, त्यातील प्रमुख नर्स बाहेरच्या कक्षातून आत येताना दिसत आहे. दुसऱ्या दोन नर्सेस या कक्षाच्या आत ड्युटीवर असतानाही बाहेर झोपलेल्या होत्या, हे स्पष्ट होत आहे. फायर सिस्टीममधील पाईप तकलादू आहेत. ते योग्य क्षमतेचे नाहीत. हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *