Headlines

पोलिसांची चाहूल लागताच दोघे पसार, मागे राहिली मोबाइलने भरलेली बॅग:दत्तनगरमध्ये पोलिसांची कारवाई; जप्त 55 मोबाइलची किंमत 18.34 लाख रुपये‎



शिर्डी शहरातील दत्तनगर परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या कारवाईत नामांकित कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल फोन जप्त केले. या मोबाईलची किंमत सुमारे १८ लाख ३४ हजार रुपये आहे. पोलिस पथकाची चाहूल लागताच घरातील दोन व्यक्तींनी मागील द

.

२९ सप्टेंबरच्या रात्री शिर्डी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना दत्तनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झारखंड येथून वास्तव्यास आलेल्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पोलिस संबंधित ठिकाणी पोहोचताच दोन व्यक्तींनी पलायन केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊनही ते हाती लागले नाहीत.

त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली असता बॅग आढळली. झडती घेतल्यावर त्यात विविध नामांकित कंपन्यांचे ५५ मोबाईल मिळाले. पोलिसांनी पंचनामा करून १८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६१/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ व १२४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष लांडे करीत आहेत

५५ मोबाईलचा ‘स्रोत’ शोधणार पोलिस जप्त करण्यात आलेले मोबाईल नेमके कुठून आणण्यात आले, त्यांची खरेदी-विक्री झाली होती का, तसेच हे मोबाईल शिर्डी, अहिल्यानगर किंवा नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या घटनांशी संबंधित आहेत का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. मोबाईलचे आयएमइआय क्रमांक तपासल्यानंतर त्यांचा पूर्वीचा वापर, मालकी किंवा चोरीची नोंद याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *