![]()
अध्यात्माच्या भूमीत आता ज्ञानाचाही जागर सुरू झाला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने तारकेश्वर गडावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
.
तारकेश्वरगड (महिंदा, ता. आष्टी) येथे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत केंद्र व अभ्यासिकेचा शुभारंभ झाला. यावेळी उद्योजक आबा नागरगोजे, सतीश केंद्रे, बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे आदी उपस्थित होते. बुगे म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठीही मदत मिळेल. अध्यात्म मनाला दिशा देते, तर शिक्षण जीवनाला दिशा देते.
या दोन्हींचा संगम तारकेश्वर गडावर घडत आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पाथर्डी शहरात विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविणारे बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे म्हणाले, अध्यात्माच्या भूमीत ज्ञानाचा जागर सुरू झाला आहे. आपण येथे का आलो आहोत, याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.
महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना संस्कार व शिक्षणाचे महत्त्व पटवून देत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. गडावर भक्तीची ऊर्जा, शिक्षणाची शक्ती आणि त्यातून स्पर्धा परीक्षांमध्ये शस्वी आदर्श व्यक्तिमत्त्वे घडतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सेवेकरी, भक्तगण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महादेव कौसे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ महाराज यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.