![]()
तीन अपत्ये असतानाही राम शिंदे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचा दावा करत पवार यांनी त्यांना कायद्याचे नियमच ठाऊक नाहीत, त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना लगावला आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? रोहित पवार म्हणाले की, तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं. मला विरोध करण्यासाठी शिंदेंना पद रोहित पवार म्हणाले की, एकतर कर्जत-जामखेडमध्ये केवळ मला विरोध करण्यासाठी आणि मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठीच त्यांना पद देण्यात आलं हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य आहे. पण त्यांना साधे कायदे-नियमही माहित नसतील तर अशा व्यक्तीला सभापती पदावरून तातडीने हटवून गणपती मंडळाच्या किंवा स्थानिक उत्सव मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्त करावं. यामुळं सभापतीपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची अप्रतिष्ठा आणि महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही. ..तर हुशार आमदाराला संधी मिळेल रोहित पवार म्हणाले की, एकतर सगळीकडंच प्रा. राम शिंदे यांचा झेंडा लावला जात असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ‘हाथ खाली और बजाओ ताली…’ अशीच झाली. त्यामुळं त्यांना सभापती पदावरून हटवलं तर किमान कायद्याची जाण असलेल्या हुशार आमदाराला तरी या पदावर काम करण्याची संधी मिळेल. हे ही वृत्त वाचा प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाचा सविस्तर
Source link
विधानपरिषद सभापतींना कायदे-नियम माहीत नसतील तर काय बोलावं?:राम शिंदेंना सभापती पदावरून हटवून उत्सव मंडळात पाठवावे- रोहित पवार