Headlines

विरोधकांच्या टीकेला कृषिमंत्र्यांचे आकडेवारीतून उत्तर!:कर्जमाफीचे 13,500 कोटी खात्यात जमा, दुष्काळग्रस्तांनाही तातडीने मदत देणार- भरणे




एल निनोच्या संकटामुळे आणि पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, आजपासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहोत, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना भरीव मदत देऊ,” अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामती येथे केली. दुष्काळ जाहीर आणि उद्यापासून पंचनामे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः जळून गेले आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणारी अधिसूचना काढण्यात आली आहे. अधिसूचना निघाल्यामुळे आता उद्यापासूनच तातडीने पंचनाम्यांच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. कर्जमाफीचे १३,५०० कोटी रुपये खात्यात जमा ‘सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील’, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर बोलताना कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीची सविस्तर आकडेवारी मांडली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा फायदा ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असून, एकूण ४० हजार ८८५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. यापैकी पहिल्या यादीतील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटी, दुसऱ्या यादीतील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटी आणि तिसऱ्या यादीतील ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांसाठी ३ हजार कोटी रुपये असे एकूण १३ हजार ५०० कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात शासनाने जमा केले आहेत. उर्वरित रक्कमही टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेला उत्तर आदित्य ठाकरे यांनी ‘दुष्काळ जाहीर झाला पण मदत तातडीने मिळावी’ अशी मागणी केली होती. यावर बोलताना भरणे म्हणाले, “आम्ही मदत द्यायलाच बसलो आहोत. आम्ही शेताच्या बांधावर राहणारी माणसे आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना तातडीने मदत दिली जाईल.” हेही वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *