![]()
सामाजिक दायित्व निधीच्या (सीएसआर) नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्य आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पर्दाफाश केला. बनावट वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर निधी लाटून तो पुन्हा देणगीदारांपर्यंत फिरवणाऱ्या रॅके
.
यात महाराष्ट्रातील ५ व ३ राज्यांतील ८ ठिकाणांवर छापे टाकले. या साखळीचा मुख्य सूत्रधार डॉ. धर्मेंद्र कुमार हा आहे. कायद्यानुसार बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना नफ्यातील २ टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करावी लागते. कुमारने बनावट रुग्ण, खोटे अहवाल व बोगस प्रकल्प दाखवून देणग्या मिळवल्या. हा निधी कमिशन कापून रक्कम हवाला व रोखीने मूळ देणगीदारांकडे परत पाठवली.
बोगस ट्रस्टचे विश्वस्त व हवाला मध्यस्थ रडारवर ईडीने मोहीम राबवत महाराष्ट्रातील ५ ठिकाणांसह पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली-एनसीआरमधील संशयित अड्ड्यांवर झाडाझडती घेतली. सूत्रधार डॉ. धर्मेंद्र कुमारसह मार्केट ऑपरेटर्स, बोगस ट्रस्टचे विश्वस्त आणि हवाला मध्यस्थ रडारवर असून त्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.