![]()
राहुल गांधी यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत हे अशा पद्धतीचा मोर्चा काढत आहेत. इंडिया आघाडी ही कोणत्याही वैचारिक मुद्द्यावर बनलेली नाही, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी आणि कुटुंब वाचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. दिल्लीत गांधी कुटुंब, युपीत यादव तर मुंबईत ठाकरे कुटुंब, पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी कुटुंब वाचवण्याचे काम करण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसकडून उबाठा गटाला विचारात घेतले जात नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंना बोलवले जात नाही. या आघाडीची बिघाडी झाली आहे. काँग्रेस वेगळी चूल मांडत आहे. तर आम आदमी पार्टी बैठकीला उपस्थित राहत नाही. उद्धव ठाकरे बळजबरी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहून आम्हाला विचारात घेतले जात नाही असे सांगत होते, असे बन यांनी म्हटले आहे. उबाठाने शेतकऱ्यांना मदत करावी महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. यावेळी गर्जना मोर्चा काढण्यापेक्षा गरजू शेतकऱ्यांना मदत करावी, त्यामुळे त्यांचे भले होईल. निवडणूक आयोगाच्याविरोधात मोर्चा काढण्यासाठी पुढचे दोन वर्षे आहेत.परंतु आता तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करत आधार देण्याची गरज आहे. या मोर्चाच्या माध्यमातून करोडो रुपयांची उधळपट्टी करणार आहात. राऊतांनी सांगतले आहे की महाराष्ट्रभरातून आंदोलक मुंबईत येणार आहेत. त्यासाठी पेट्रोल, डिझेल, गाड्यासाठी मोठा खर्च येईल तो टाळत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करते आहे, शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. परंतु उबाठा गट आणि मनसेने राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. गर्जना मोर्चा काढण्यापेक्षा गरजू आणि गरजवंत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जिथे विजय झाला तिथे सर्व योग्य का? नवनाथ बन म्हणाले की, उबाठाचा मोर्चा जर लोकशाही वाचवण्यासाठी असता तर केरळमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यात भाजप सत्तेत नाही तामिळनाडू सोडले तर बाकीच्या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. तिथे काँग्रेसचा विजय झाला तर तिथे निवडणूक आयोग, एसआयआर सर्व काही चांगले असते आणि जिथे पराभव झाला त्या ठिकाणी आरोप करण्यात येतात. मनसेचा उबाठाविरोधात मोर्चा? नवनाथ बन म्हणाले की, मनसे आणि अमित ठाकरे नेमके कोणाच्याविरोधात मोर्चा काढत आहेत. निवडणूक आयोग की ठाकरे गट कारण ज्या दादरमध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला त्या मतदारसंघात उबाठा गटाचे आमदार महेश सावंत निवडून आले आहेत. ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत का? आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून आलेत ते राजीनामा देणार आहेत का? मुळात हा मोर्चा गर्जना नाही तर गजकर्ण मोर्चा आहे. हे तसेच वागत नौटंकी करण्याचे काम करत आहे. अमित ठाकरेंचा पराभव तर उबाठा गटाने केला आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध उबाठा गट मोर्चा काढण्यापेक्षा आता शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यासाठी मोर्चा काढा. हे ही वृत्त वाचा विधानपरिषद सभापतींना कायदे-नियम माहीत नसतील तर काय बोलावं?:राम शिंदेंना सभापती पदावरून हटवून उत्सव मंडळात पाठवावे- रोहित पवार
तीन अपत्ये असतानाही राम शिंदे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचा दावा करत पवार यांनी त्यांना कायद्याचे नियमच ठाऊक नाहीत, त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना लगावला आहे. वाचा सविस्तर
Source link
इंडिया आघाडी म्हणजे कुटुंब वाचवण्यासाठीचा प्रयत्न:उबाठा-मनसेचा मोर्चा 'गर्जना' नाही तर 'गजकर्ण' मोर्चा- नवनाथ बन