Headlines

लोणार सरोवराच्या काठावरील 1 हजार वर्षे जुनी 6मंदिरे पूर्ण पाण्याखाली:ताशी 50 हजार लिटर गोड्या पाण्याने सरोवराची क्षारता घटली, पहिल्यांदाच नवरात्रोत्सवात कमळजादेवीचे दर्शन दुर्लभ



बेसाल्ट खडकातील जगातील एकमेव क्षारयुक्त लोणार सरोवर स्वत:चे अस्तित्व वाचवण्यासाठी झुंज देत आहे. कारण तळाशी व पायथ्याशी झरे प्रवाहित झाल्याने या सरोवरात प्रतितास सुमारे ५० हजार लिटर गोडे पाणी मिसळत आहे. या अनियंत्रित जलप्रवाहाने सरोवराची पाण्याची पातळ

.

या उपाययोजना करणे आवश्यक

  • आयआयटीने सखोल संशोधन करून अंतिम अहवाल तात्काळ देणे.
  • केंद्र व राज्य सरकारने सरोवराचे अस्तित्व वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे. त्यांच्याकडे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत.
  • उच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी आवश्यक.
  • भूगर्भतज्ज्ञांच्या सल्ल्याने झऱ्यांचे पाणी अडवून ते विद्युत पंपाने लिफ्ट करावे.
  • पाण्यात बुडालेल्या हेमाडपंती मंदिराच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात.

भारतीय पुरातत्त्व विभागानेही ६ मंदिरे पूर्ण पाण्यात बुडाली असल्याचे मान्य केले आहे. उपाययोजना मात्र त्यांच्याकडून काहीही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लोणारकर संतप्त झाले. त्यांनी मंदिरे पाण्यातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

ही ६ प्रसिद्ध हेमाडपंती मंदिरे पाण्यात बुडाली

  • अंबरखाना
  • मुंगळा महादेव
  • मोर मंदिर
  • देशमुख महादेव
  • चोपडा महादेव
  • बशीचा महादेव

गोडे पाणी वाढल्याने 4 गंभीर धोके

1 लोणार हे मंगळ ग्रहावरील वातावरणाशी व खडकांशी साम्य असणारे जगातील मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे हे केवळ स्थानिक सरोवर नसून आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून याकडे शास्त्रज्ञ बघतात, तीच संकटात आहे. 2 लोणारच्या तीव्र क्षारयुक्त पाण्यात राहणारे सूक्ष्मजीव हे सामान्य पाण्यात जिवंत राहू शकत नाहीत. गोड्या पाण्यामुळे या दुर्मिळ सूक्ष्मजीवांची प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. दुर्मिळ औषधी वनस्पती, शेवाळ, मशरूम धोक्यात. 3 कमळजादेवीचे दर्शन बंद झाल्यामुळे आणि सरोवराभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे देशभरातील भक्तगण कमी झाले आहेत. स्थानिक गाइड्स, लहान व्यावसायिक व हॉटेल्सचा रोजगार धोक्यात येईल. 4 सरोवराच्या काठावरील झाडे पाण्यामुळे सुकली आहेत. आणखी पातळी वाढल्यास जंगलात पाणी शिरणार.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *