Headlines

Shashikant Shinde Slams Konkan Drought Situation & Mumbai-Goa Highway


“महाराष्ट्रात यापूर्वी कधीही नव्हता इतका भीषण दुष्काळ यंदा जाणवत असून कोकणातील परिस्थितीही अतिशय बिकट आहे. सरकारने रायगड जिल्ह्यातील केवळ एक-दोन तालुके न घेता संपूर्ण कोकणात दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि शेतमज

.

रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दुष्काळ निवारण, दोन राष्ट्रवादींचे कथित विलीनीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट काम, राजकीय आरक्षण वाद आणि रायगडमधील स्थानिक समस्यांवर सरकारचा समाचार घेतला.

टप्प्याटप्प्याने तालुके जाहीर करण्याचे नाटक बंद करा!

दुष्काळाच्या निकषांवरून राज्य सरकारवर टीका करताना शशिकांत शिंदे म्हणाले, कोकणात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे पाठवून दुष्काळ उपाययोजनांसंदर्भात ठोस सूचना केल्या आहेत.

“सरकार टप्प्याटप्प्याने तालुके जाहीर करण्याचे नाटक करत आहे. रायगडमधील केवळ श्रीवर्धनचा विचार करून चालणार नाही, तर उर्वरित १४ तालुक्यांसह संपूर्ण कोकणाचा दुष्काळात समावेश केला पाहिजे. निकषात बसणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये तातडीने दिले पाहिजेत. सरकारने स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर यावे, अन्यथा त्यांना तिथे येण्यास आम्ही भाग पाडू,” असा इशारा त्यांनी दिला. रायगड जिल्ह्याला अनेक वर्षे हक्काचा पालकमंत्री नव्हता. आता नवनिर्वाचित पालकमंत्री मिळाले आहेत, त्यांनी कार्यालयात न बसता दुष्काळी संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विलीनीकरणाचा विषय आता संपला; पक्ष रस्त्यावर उतरून लढणार

अजित पवार गटासोबतच्या संभाव्य विलीनीकरणाच्या सातत्याने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे यांनी स्पष्ट केले, “परवाच्या बैठकीत आदरणीय शरद पवार साहेबांनी पक्षाची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय आता कायमचा संपलेला आहे. साहेबांच्या विधानाशी आम्ही सर्वजण बांधील आहोत.” आता पक्ष पूर्ण ताकदीने दुष्काळ निवारण, सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनामध्ये अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेला दिसेल. रायगड जिल्हा हा नेहमीच पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा राहिला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करून आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये होईल!

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट कामावर ताशेरे ओढताना ते म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गाचे काम इतके निकृष्ट दर्जाचे झाले आहे की, मला वाटते याची नोंद लवकरच ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करावी लागेल. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्याबाबत अडचणी असल्याचे मान्य केले होते. केवळ रस्ता करायचा म्हणून थातूरमातूर डागडुजी केली जात आहे.” विधिमंडळ आणि संसदेत सातत्याने आवाज उठवूनही कंत्राटदार ढिम्म आहेत. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई केली पाहिजे.

जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून सत्तेचे लोणी खाण्याचा डाव

आरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधताना शशिकांत शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा सर्वधर्मसमभावाची राहिली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या समाजांना खोटी प्रलोभने आणि आश्वासने दिली. आज ती पूर्ण होत नसल्याने आझाद मैदानावर मोर्चे निघत आहेत.”

“मराठा, ओबीसी, धनगर आणि मातंग अशा विविध घटकांमध्ये आपापसांत लढाया लावायच्या आणि स्वतः सत्तेचे लोणी खायचे, हा सत्ताधाऱ्यांचा डाव आता जनतेला समजला आहे. हा प्रकार फार काळ चालणार नसून योग्य वेळी महाराष्ट्राची सुज्ञ जनता मतपेटीतून राजकीय परिवर्तन घडवून आणेल.”

पर्यटकांची सुरक्षा आणि रायगडमधील दुर्घटनांवर चिंता

रायगडमध्ये नुकत्याच सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूवर त्यांनी शोक व्यक्त केला, कोकणात पर्यटन विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, मात्र समुद्रकिनारे आणि धोकादायक पर्यटन स्थळांवर जीवरक्षक किंवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना घडत असून मृतांच्या वारसांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी.

राजकीय नेत्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणांमध्ये सीबीआय किंवा सीआयडीमार्फत केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते; परंतु सत्य कधीही जनतेसमोर आणले जात नाही. या दिरंगाईमुळे व्यवस्थेवर संशय निर्माण होत असून आम्ही अशा अर्धवट तपासावर अजिबात समाधानी नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी शेवटी नमूद केले.

————————————–

हेही वाचा…

पूर्णेकर हत्येच्या आरोपांवर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार:ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंना अटक का झाली नाही?

ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, या दुःखाचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घाणेरडे राजकारण उबाठा गट करत आहे. मूळ एफआयआरमध्ये (FIR) आमचे नाव नसताना केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या पतीला यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत,” असा घणाघाती आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.