![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या गर्भगृहातील भिंत, खांब यावरील तेलाचे, हळदी ,कुंकवाचे डाग पुसून काढले जाणार असून त्यासाठी ता. ५ ऑक्टोबर पासून एक महिनाभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे आता एक महिनाभर भाविकांची रेचलेच थांबणार आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे मंदिराच्या परिसरात विकास कामे केली जात आहे. त्यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यापैकी साडेसात लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला संरक्षण भिंत, गाळे बांधकामासाठी देण्यात आला आहे. या शिवाय उर्वरीत साडेसात लाख रुपयांचा निधी पुरातत्व विभागाला देण्यात आला आहे. यातून मुख्यमंदिराच्या भिंतीवर तसेच गर्भगृहातील खांबावर असलेले तेलकट व हळदी कुंकवाचे असलेले डाग पूसून काढण्यासोबतच पावसाळ्यात मंदिरातील पाण्याची गळती बंद केली जाणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाकडे साडेसात कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे यांनी बुधवारी ता. ३० औंढा नागनाथ येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या परिसरातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या आहेत. त्यांच्या भेटीनंतर आता पुरातत्व विभागाने कामाला गती दिली आहे. यामध्ये मुख्य मंदिर व गर्भगृहातील भिंती तसेच खांबावरील तेलकट डाग विविध केमीकल्स वापरून पुसले जाणार आहेत. सदर कामे करीत असतांना भाविकांची गर्दी राहिल्या कामे करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे ता. ५ ऑक्टोबरपासून पुढील एक महिना मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाविकांची होणारी रेचलेच एक महिनाभर थांबणार आहे. दररोजची पुजा सुरु राहणार नागनाथ मंदिरात दररोज सकाळी होणारी पुजा, दुपारचा महानैवेद्य रात्रीची शेजारती नित्यनियमाने केली जाणार आहे. यामध्ये कुठेही खंड पडणार नाही.
Source link
औंढा नागनाथ मंदिर एक महिनाभर भाविकांसाठी बंद राहणार:पुरातत्व विभागाकडून गर्भगृहातील कामकाज सुरु होणार असल्याचे कारण समोर