Headlines

फुलंब्री:बोरगाव अर्जच्या विवान बलांडेला तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक




जम्मू-काश्मीर येथील जम्मू विद्यापीठात २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या मिनी व ८ व्या चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील खेळाडू विवान भाऊसाहेब बलांडे याने चमकदार व दमदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर थेट कांस्यपदक पटकावले आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात हे घवघवीत यश मिळवणारा विवान हा बोरगाव अर्ज या गावातून राष्ट्रीय पातळीवर चमकणारा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. फूलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असलेला विवान बलांडे याने राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवून संपूर्ण महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या मानात मोठी भर घातली आहे. बालवयातच विवानने नोंदवलेल्या या अत्यंत उज्ज्वल यशामागे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्यक्षम सचिव उदय डोंगरे तसेच प्रशिक्षक अजय त्रिभुवन यांचे मोलाचे व सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. लहान वयात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विवानचे क्रीडा प्रेमींसह सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *