Headlines

विमानात प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली:'डॉक्टर' भागवत कराड तातडीने मदतीला धावले, विमानातील ऑक्सीजन देत केली प्रकृती स्थिर




दिल्लीहून मिझोरमची राजधानी आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, याच विमानातून प्रवास करत असलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका ‘डॉक्टर’ची भूमिका बजावली आणि प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भागवत कराड हे मिझोरम दौऱ्यासाठी दिल्लीवरून इंडिगोच्या (6E 291) विमानाने आइजोलकडे प्रवास करत होते. विमान हवेत असतानाच एका प्रवाशाला अचानक गंभीर त्रास होऊ लागला आणि त्याची प्रकृती खालावली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच विमानात एकच गोंधळ उडाला. अशा वेळी डॉ. कराड यांनी आपल्यातील डॉक्टरला जागे केले आणि त्वरित त्या प्रवाशाच्या मदतीसाठी धाव घेतली. प्रवाशाची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉ. कराड यांनी विमानात उपलब्ध असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा वापर करून तातडीने उपाययोजना सुरू केल्या. रुग्णाला ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांनी विमानात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून प्रवाशाला ऑक्सिजन दिला. यामुळे प्रवाशाची प्रकृती काहीशी स्थिर होण्यास मदत झाली. त्यानंतर, विमान आइजोल विमानतळावर लँड होताच विमानतळ प्रशासनाच्या मदतीने प्रवाशाला ऑक्सिजनसह तत्काळ रुग्णवाहिकेत हलवण्यात आले व पुढील उपचारांसाठी सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *