Headlines

महावितरण नाट्य स्पर्धा:जळगाव परिमंडलाचे 'वारी' प्रथम, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे 'राजाभियोग' द्वितीय




महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाच्या ‘वारी’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम क्रमांक पटकावला. तर छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या ‘राजाभियोग’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित या स्पर्धेचा शानदार समारोप शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पार पडला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने पेशवाईतील सत्तासंघर्ष आणि न्यायदानाचे हुबेहूब चित्रण करणारे ‘राजाभियोग’ हे नाटक सादर केले. तर लातूर परिमंडलाने मानवी मूल्ये, सामाजिक विसंगती आणि आजच्या काळातील वैचारिक गोंधळावर भाष्य करणारे ‘रंगलेल्या गालाचा’ हे नाटक रंगमंचावर आणले. दोन्ही नाटकांना नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाट्यस्पर्धेच्या निकालानंतर लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, सांघिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक (मा.सं.) राजेंद्र पांडे, अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण, परीक्षक डॉ. दिलीप घारे, पद्मनाभ पाठक, योगिता महाजन व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा परिचय डॉ. शिवाजी तिकांडे यांनी करून दिला, तर अविनाश सानप यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: सर्वोत्कृष्ट नाटक: सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: उत्कृष्ट अभिनय (पुरुष): उत्कृष्ट अभिनय (स्त्री): नेपथ्य: प्रकाशयोजना: संगीत: रंगभूषा व वेशभूषा: कर्मचारी लेखक: उत्तेजनार्थ अभिनय: उत्कृष्ट बालकलाकार:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *