Headlines

टंचाईच्या छायेत फुलशेती; अडीच हजार हेक्टरवर संकट:पावसाची 32 टक्के कमतरता, दसरा-दिवाळीतील दरांवर परिणामाची शक्यता‎




कृषी विभागाच्या खरीप अंतिम पेरणी अहवालानुसार, जिल्ह्यात २,५३९.८५ हेक्टरवर फुलपिकांची पेरणी नोंदली आहे. मात्र जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट, वाढती पाणीटंचाई आणि पुढील काळात कमी पावसाचा अंदाज यामुळे ही फुलशेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सुमारे १,१४८.२० हेक्टरवर पेरणी होती. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या काळात सरासरीच्या ६७.५ टक्के पाऊस झाला असून सुमारे ३२ टक्के तूट आहे; राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव आणि शेवगाव तालुक्यांत निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडला. जिल्ह्यातील १३१ पैकी ११२ महसूल मंडळांत २० दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड राहिला. १३ सप्टेंबरपर्यंत केवळ २२ दिवस पाऊस झाला होता. गेल्या वर्षी त्याच काळापर्यंत सुमारे ५८५.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा केवळ २५७.३ मिमी पाऊस नोंदवला. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु, एलनिनो इफेक्टमुळे फुलशेती संकटात सापडली आहे. सुपा परिसरातील शेतकरी मर्यादित पाण्यावर झेंडू, गुलाब, शेवंती, ॲस्टर अशी फुले घेतात, त्यामुळे विहिरी आणि बोअरची पातळी खालावल्यास फटका बसू शकतो. कोरड्या व उष्ण हवामानाचा फटका ^ फुलशेतीकडे कल कमी होत आहे, त्याला प्रमुख कारण म्हणजे मार्केट उपलब्धता. पुण्यामधून मार्केट मिळते. त्यातच हवामान कोरडे व उष्ण असल्याचाही फटका फुलशेतीला बसला आहे. परिणामी फुलांच्या गुणवत्तेवर व पर्यायाने अपेक्षित दर मिळत नाहीत. इनडोअर अर्थात पॉलिहाऊस व आउटडोअर फुलांचे उत्पादन होते. त्यात पॉलिहाऊस खर्चिक आहे. मार्केट अॅक्सेससाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. – चांगदेव जवने, निवृत्त कृषी अधिकारी, तथा फूल उत्पादक. आधीच टंचाई, त्यात दराचे संकट २०२४ च्या दसऱ्याला १०० ते २०० रुपये किलोपर्यंत गेला. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आवक वाढू शकते. परंतु, सध्याचे बाजार समितीतील दर अत्यल्प आहेत. अहिल्यानगर बाजार समितीत शेवंती अवघी १८ ते ५४ रुपये तर झेंडू अवघा ९ ते २७ रुपये किलो विकला जात आहे. दसऱ्याला किरकोळ बाजारात पुन्हा दर १०० ते १५० रुपयांवर जाऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *