![]()
अकलूज राज्यातील अनेक भागांत अपुरा व खंडित पाऊस झाल्याने शेतीबरोबरच पशुधनावरही मोठे संकट निर्माण झाले आहे. आगामी काळात चारा व पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या ताब्यातील जमिनी, शेती महामंडळ, वन विभाग तसेच मोठ्या देवस्थानांच्या जमिनींचा वापर करून चारा पिकांची लागवड करावी, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांच्या उपजीविकेत पशुधनाचे महत्त्व मोठे आहे. दुष्काळामुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास पशुधनाची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासकीय व देवस्थानांच्या जमिनींवर चारा लागवड हाती घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावा दुष्काळामुळे दूध उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये, म्हणून दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये विशेष अनुदान देणारी योजना तातडीने लागू करावी. ही रक्कमही थेट खात्यावर जमा करून पशुधन टिकवण्यासाठी शासनाने तातडीने आदेश द्यावेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. शासनाच्या तातडीच्या मदतीकडे शेतकऱ््यांचे लक्ष लागले आहे.मदतीमुळे शेतकऱ्यांचे जीवन सुकर होई ल. डीबीटीद्वारे थेट आर्थिक मदतीची केली मागणी शेळी, मेंढी, गाय व म्हैस या पशुधनासाठी शासकीय जमिनींवर नियंत्रित चराईची सुविधा द्यावी. तसेच अधिकृत पशुधन गणनेच्या आधारे गावनिहाय व तालुकानिहाय संख्या निश्चित करून आवश्यक चारा-पाण्यासाठी पात्र पशुपालकांना थेट आर्थिक सहाय्य देण्यात यावे. ही मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ‘डीबीटी’द्वारे थेट जमा करावी, असे खा. मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले.
Source link
पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना करा:खा. धैर्यशील मोहितेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी