Headlines

Frequent repairs of the bridge at Shetphal have left motorists confused, repairs are always being carried out on the Solapur-Pune highway



सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मोहोळ ते शेटफळ दरम्यान मोठ्या चाकोऱ्या पडल्याने चारचाकी व दुचाकी चालकांच्या जिवाचा धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत.

.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा मोहोळ तालुक्यातून गेला असून, तालुक्यातील चिखली ते देवडी दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या चाकोऱ्या पडल्या आहेत. या चाकोऱ्यांमधून वाहने चालवताना चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. चाकोऱ्यांमध्ये वाहने जाऊन अनेक मोठे अपघात घडले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे की ‘अपघात महामार्ग’, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण हटाव मोहिमेप्रमाणेच दर्जेदार रस्ते मोहीम हाती घेतल्यास अपघात रोखण्यास मोठी मदत होईल.

तसेच यावली येथील चौकातील अपघात रोखण्यासाठी उभारण्यात आलेला पूल (ब्रिज) दुरुस्तीच्या नावाखाली सतत बंद ठेवला जात आहे. या पुलावर जाऊन पाहिले असता पुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. वाहतूक रोखली जाते ^यावली येथे ब्रिजचे काम पूर्ण होऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली महिन्यातून दोनवेळा या पुलावरील वाहतूक रोखली जाते. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर अनेक ठिकाणी चाकोऱ्या पडल्याने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चाकोऱ्यांसह रस्त्याचे दर्जेदार काम करण्याचे आदेश द्यावेत. सुग्रीव गुंड, चालक

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी, रस्त्याची दुरुस्ती ना बदल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाची पाहणी करून चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. यापूर्वी इतर अधिकाऱ्यांमार्फत रस्त्याची पाहणी झाली, मात्र ना दुरुस्ती झाली ना बदल; फक्त पाहणीचा देखावा करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *