![]()
केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्यानंतर, साधारण 11 वाजता ‘मेट्रो सिनेमा ते महापालिका’ असा हा संयुक्त मोर्चा मार्गक्रमण करेल. या लक्षवेधी मोर्चामध्ये राज आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाविरोधात कोणती भूमिका मांडतात आणि काय गर्जना करतात, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
निवडणूक आयुक्ताविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार!:मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा; उद्धव आणि राज ठाकरेंच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष