![]()
राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र झाली आहे. काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघात मोठा बदल करत धक्कातंत्र अवलंबले असून, इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या शरद लाड यांच्याऐवजी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या केंद्रीय आणि प्रांतिक पातळीवरील घडामोडींनुसार, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे हायकमांडसोबत चर्चेसाठी शनिवारी (दि. 3) दिल्लीला गेले होते. तिथे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या तीनही मतदारसंघांतील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि रविवारी दुपारी ही यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजपचे तीन उमेदवार पुण्यात धक्कातंत्र पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीने शरद लाड यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते आणि ते बऱ्याच दिवसांपासून तयारीही करत होते; मात्र ऐनवेळी पक्षाने धक्कातंत्र वापरत डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. नागपूर-पुणे शिक्षक मतदारसंघात यांना उमेदवारी भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या जागेसाठी माजी आमदार अनिल सोले यांच्याही नावाची चर्चा रंगली होती. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांनी त्यांच्या नावासाठी विशेष आग्रह धरला होता. या सर्व घडामोडींमुळे आता विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रंगत वाढली आहे. हे ही वृत्त वाचा गपूर-वर्धा मार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रेलरच्या धडकेत आई-वडीलांसह 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, एक चिमुकला गंभीर
नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चालकाचा शोध घेतला जात आहे. वाचा सविस्तर
Source link
भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर:पुण्यातून डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना संधी तर नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी