Headlines

अर्धा किलोमीटर चालणार आणि मोर्चा यशस्वी झाल्याचं दाखवणार:ठाकरेंच्या मोर्चावर संजय शिरसाट यांची खोचक टीका, काय म्हणाले शिरसाट?




केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काढण्यात आलेला ‘गर्जना मोर्चा’ चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधून जोरदार टीका केली आहे. मुंबईतल्या मोर्चापेक्षा दोन भाऊ एकत्र येतात, याची चर्चा आहे. पब्लिसिटीसाठी टी-शर्ट घालून हवा करण्याचा हा मोर्चा आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली. संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंना थेट सवाल करत त्यांच्या एकत्रित येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातला मोर्चा म्हणताय, एकातरी पक्षाने सहकार्य केलं का तुम्हाला? बरं, नेतृत्व कोणाचं? उद्धव की राजचं हेही सांगा, असा खोचक सवाल मंत्री शिरसाट यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आज मुंबईत जो मोर्चा निघतोय त्यापेक्षा दोन भाऊ एकत्र येतायत, याचीच चर्चा आहे. पब्लिसिटीसाठी हा मोर्चा आहे. टी-शर्ट घालून हवा करण्याचा मोर्चा आहे. हे अर्धा किलोमीटर चालणार आणि यशस्वी झाला असं दाखवणार. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातला मोर्चा आहे, असं म्हणताय एकतरी पक्षाने सहकार्य केलं का? बरं नेतृत्व कोणाचे उद्धव की राजचे हेही सांगा. हा इव्हेंट आहे, याला फार प्रतिसाद मिळणार नाही.टी-शर्ट वाटून काढलेला हा मोर्चा आहे.कसली गर्जना?हातात हात घालून फोटो काढण्याचा हा मोर्चा. मग जंतर-मंतरवर जा. चलो दिल्ली म्हणा, यांना माहिती आहे, यांना माहिती टिकत नाही म्हणून उगाच करत आहेत. शरद पवार किंवा अजून कोणाचा पाठिंबा?कुणी त्यांचे लोक गेले का? असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच सीजेपीला यांनीच विरोध केला होता. स्वतःचे सक्सेस दाखवायला की आजची अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत म्हटल्यावर कोणी येईल कोणी जाईल असे होईल का? मागणी करताना योग्य करावी, ज्ञानेश कुमार यांच्याबाबत मागणी योग्य असेल तर त्याचा विचार केंद्र सरकार करेल, असेहीह संजय शिरसाट यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *