![]()
बदलत्या परिस्थितीत केमिस्ट बांधवांनी अन्न व औषध क्षेत्रातील नवीन नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, व्यवसाय करताना आवश्यक काळजी घ्यावी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन नाशिक जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत मोरे यांनी केले. फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लासलगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व निफाड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका केमिस्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत मोरे यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांसह औषध व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली. कार्यक्रमास एमएससीडीए सेंट्रल झोनचे सचिव महेश भावसार, नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन देवरगावकर, नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव गणेश निकम, माजी अध्यक्ष सुदेश आहेर, निफाड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष किरण शिंदे तसेच जिल्हा असोसिएशनचे सदस्य नितीन नाहटा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लासलगाव केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश फड, उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, सचिव शेखर सोनवणे, खजिनदार सौरभ भंडारी, योगेश गायकवाड व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मयुरी भंडारी यांनी केले. संतोष डागा यांनी आभार मानले. शेकडो केमिस्टची उपस्थिती ओझर, विंचूर, खेडले, झुंगे, निफाड, चांदोरी, सायखेडा, चितेगाव, पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, रानवड, खडक माळेगाव यांसह निफाड तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो केमिस्ट व फार्मासिस्ट बांधव कार्यशाळेस उपस्थित होते.
Source link
नियमांचे पालन करा, आव्हानांना सामोरे जा:एफडीएचे सहआयुक्त चंद्रकांत मोरे यांचे मार्गदर्शन; फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लासलगावी कार्यशाळा