Headlines

केवळ पाहणी, फाेटाेसेशन नकाे;‎शेतकऱ्यांना तातडीने थेट मदत द्या‎:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महसूलमंत्र्यांची घेतली भेट; निवेदन केले सादर‎



जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, सध्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. पंचनामेही सुरू आहेत. मात्र केवळ पाहणी, ‘फोटोसेशन’ नको तर शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या यु

.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी कृषिमंत्र्यांनी अकोल्यात िवभागीय बैठक घेतली होती. त्यानंतर दुष्काळी जाहीर झाला. गत आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. नंतर शनिवारी महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला शासकीय विश्रामगृह व पारस येथे शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारत संबंधित यंत्रणांना उचित कार्यवाहीचा आदेश दिला. तसेच त्यांनी अकोला तालुक्यातील येवता व बाळापूर तालुक्यातील मानकी येथील शेतीची पाहणी केली होती. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यांच्याकडे फोटोसशनसह अन्य बाबींवर संताप व्यक्त करत तातडीने मदत देण्यासह अन्य मागण्या केल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करत मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढील मागण्या करून काही इशारेही दिले. कागदावर ४० ते ८० टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक न करता, प्रत्यक्ष १०० टक्के नुकसान नोंदवण्यात यावे. राजकीय दौरे बंद करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा करावी. अधिकारी शेतात न जाता गावातच बसून सह्या घेत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई व्हावी. सन २०२४ ते २०२६ मधील प्रलंबित पीक विमा तत्काळ जमा करावा. नियमित कर्जदारांना १२ लाखांचे विशेष अनुदान व २०१९ पूर्वीचे कर्ज माफ करावे. सिबिल स्कोअर खराब होऊ नये, यासाठी कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी. शेतमजुरांना २५ हजारांचे पॅकेज, वीजबिल व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *