![]()
अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्यातील गुणवडी शिवारात दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी आपल्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन उपचारांविना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आई-वडिलांनी मृतदेह शेतात नेऊन जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण प्रकाश लांडगे (वय अंदाजे 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील प्रकाश लांडगे आणि आई आशा लांडगे (रा. गुणवडी) यांना ताब्यात घेतले आहे, असे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले. प्रवीणला दारूचे व्यसन जडले होते. तो आई-वडिलांसोबतच राहत असल्याने दारूच्या कारणावरून त्यांच्यात वाद होत असत. काही दिवसांपूर्वी प्रवीण दारू पिऊन घरी आल्यानंतर झालेल्या वादातून वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी आई-वडिलांनी त्याला घरातच ठेवले. अखेर दोन दिवसांनी उपचारांविना त्याचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. मुलगा मृत पावल्यानंतर आई-वडिलांनी हा प्रकार कोणालाही न सांगता रविवारी (ता. 4) पहाटेच्या सुमारास मृतदेह घरापासून 4 कि.मी. अंतरावरील स्वतःच्या शेतात नेऊन तिथे जाळून टाकला. दरम्यान, शेतात मानवी शरीर जळाल्याची कुणकुण लागताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे जळालेले अवशेष व हाडे आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आई-वडिलांनी खुनाची कबुली दिली असल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले आहे. हे ही वृत्त वाचा
आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून पोलिसांकडून धमक्या:विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; दडपशाही थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यातच अडवून त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जात असून, ही दडपशाही त्वरित थांबवावी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. वाचा सविस्तर
Source link